MNS Letter : बनावट पत्राने वरळीत मनसेचं टेन्शन वाढलं, काय आहे पत्रात?

MNS Fake Letter : शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा द्या, असे बनावट पत्र वरळीमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाटलं असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला.

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. मतदानाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डोकेदुखी वाढवणारं एक बनावट पत्र (Fake Latter) समोर आलं आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याची म्हटलं आहे. 

शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा द्या, असे बनावट पत्र वरळीमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाटलं असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांकडून  शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. आता याप्रकरणी रितसर पोलीस तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दाखल करण्यात येणार आहे. 

Advertisement

MNS Fake Letter

पत्रात काय लिहिलं आहे?

"प्रिय वरळीकरांनो, सस्नेह जय महाराष्ट्र. आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात पोहोचलो आहोत. आपणांस मी सांगू इच्छितो की, शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मन‌सेचा सन्मान केला आहे आणि त्याचेच दायित्व म्हणून मनसेने ठरवले आहे की, हिंदूंच्या मतांचे विभाजन रोखण्यासाठी वरळीत धनुष्यबाणाला पाठिंबा देऊन शिवसेनेला समर्थन देणार आहे. आपल्या मतांचा सन्मान करा आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या. येत्या 20 नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे." या पत्रावर राज ठाकरे यांची सही देखील आहे. 

Topics mentioned in this article