जाहिरात

कल्याणमध्ये 16,000 हून अधिक दुबार मतदार! 'खोटारडेपणा करून सत्तेत आले', मनसेच्या राजू पाटलांचे आरोप

बोगस मतदारांविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. निवडणूक आयोगाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तत्काळ याद्या फिल्टर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

कल्याणमध्ये 16,000 हून अधिक दुबार मतदार! 'खोटारडेपणा करून सत्तेत आले', मनसेच्या राजू पाटलांचे आरोप

अमजद खान, कल्याण

Kalyan News : मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील गोंधळावर थेट हल्ला चढवला आहे. दिवा येथील फक्त दोन पॅनेलची तपासणी केली असता तब्बल 16,798 दुबार मतदार आढळले असून, एकाच मतदाराचे नाव पाच वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनसेच्या शाखेच्या उद्घाटनानंतर बोलताना राजू पाटील यांनी हा गंभीर आरोप करत विद्यमान सत्ताधारी ‘खोटारडेपणा करून सत्तेत आलेले आहेत' अशी सणसणीत टीका केली.

मतदार यादीत मोठा घोळ

माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मनसे नेते राजू पाटील यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मतदार यादीतील गोंधळ सर्वत्र आहे, असे सांगताना त्यांनी कल्याण ग्रामीणमधील दिवा भागाचे उदाहरण दिले. "मी स्वतः दिवा येथील फक्त दोन पॅनलची चाचणी केली, आणि त्यात 16,798 दुबार मतदार आढळले. एका एका मतदाराची नावे पाच-पाच ठिकाणी आहेत. याचाच अर्थ ही लोकं खोटेपणा करून सत्तेत आलेली आहेत. यापुढे आम्ही त्यांचा हा खोटारडेपणा चालू देणार नाही," असे ते म्हणाले. या बोगस मतदारांविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. निवडणूक आयोगाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तत्काळ याद्या फिल्टर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

(नक्की वाचा-  Viral Video: मराठीचा आग्रह धरणाऱ्या महिलेची नोकरी गेली, माही खानला कोंबडा करणार; मनसे नेत्याने घेतली शपथ)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक 'साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार' अशा चर्चा करत असताना, राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा दाखला देत शिंदे गटाला टोला लगावला. "माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चट्टेबट्टे सगळ्यांना सांगतात की साहेब परत मुख्यमंत्री होणार. याची चाहूल देवेंद्र फडणवीस यांना लागली असावी. त्यामुळेच त्यांनी स्पष्ट सांगितले की 2029 पर्यंत मुख्यमंत्री पदाची कोणतीही वेकेन्सी नाही, मीच आहे." असे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आता शांत बसावे आणि लोकांना खोटेपणा दाखवून पक्षात घेण्याचे काम करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

सत्ताधारी युतीतील भांडणांवर टीका

कल्याण-अंबरनाथ-उल्हासनगर परिसरातील स्थानिक राजकारणापासून मुंबईतील सत्तासंघर्षावरही राजू पाटील यांनी भाष्य केले. सत्तेच्या वाटेकरी असलेल्या या युतीमध्ये फक्त मलिदा दिसतो, असे त्यांचे म्हणणे आहे. "एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून मुंबईची तिजोरी खाली करण्यात आली. सगळा पैसा एमएमआरडीएच्या खात्यात वळवण्यात आला आणि त्यात मोठा भ्रष्टाचार केला गेला. तोच मलिदा त्यांना दिसतो, त्यामुळे त्यांच्यात भांडणं सुरू आहेत." कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगरमधील पालिकांचे वाटोळे करून ठेवले आहे. विकासाचे डोंगर उभे करण्याच्या नावाखाली रस्त्यात जे खड्डे पाडले, त्यातून भ्रष्टाचाराची संधी मिळावी यासाठीच त्यांची चढाओढ सुरू आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com