मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल (29 जून) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पुण्याच्या या अवस्थेवरुन राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ज्यांना NDRF चा फुल फॉर्म माहिती नाही, सुपारीबाज आता टीका करुन लागले आहे, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी यांना मिटकरी यांचा समाचार घेतला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले गजानन काळे?
70 हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजितदादांनी. तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय? स्वतः च्या घरातल्या सदस्याला एकदा नव्हे तर दोनदा (पार्थ पवार , सुनेत्रा पवार) निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राज ठाकरे यांच्या यश-अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत तुमच्या अजितदादांनी. मग जाहीर मिशी कापू आम्ही, असं ओपन चॅलेन्ज मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी अमोल मिटकरींना दिलं.
(नक्की वाचा- राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार? जितेंद्र आव्हाड नवा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत )
उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका. पक्ष चोरून पण 1 खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची. (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले.) ‘टी शर्टवर पेन लावणारा,पावसाळी बेडूक', असा उल्लेख गजानन काळे यांनी अमोल मिटकरींचा केला. आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, असा इशाराही गजानन काळे यांनी अमोल मिटकरी यांना दिला.
(नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं असेल; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं)
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
अजितदादा दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. सुपारी बहाद्दरांनी त्यांच्यावर बोलू नये. सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल कशातही त्यांना यश आलं नाही. यांची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखे आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केली होती.