जाहिरात

MNS News : 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या अमराठी मॅनेजरची मुजोरी, मनसे कार्यकर्त्यांचा कॅबिनमधून घुसून दणका

Ambarnath MNS News : अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याची घटना समोर आली. त्यानंतर संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन गोंधळ घातला.

MNS News : 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या अमराठी मॅनेजरची मुजोरी, मनसे कार्यकर्त्यांचा कॅबिनमधून घुसून दणका

निनाद करमरकर, अंबरनाथ

एअरटेल गॅलरी, डीमार्टमध्ये मराठी बोलण्यावरुन झालेल्या वादाची प्रकरणे ताजी आहेत. त्यात मनसेने संबंधितांना दणका दिला होता. आता बँक ऑफ महाराष्ट्रच्या अंबरनाथ शाखेतही असाच प्रकार समोर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याची घटना समोर आली. त्यानंतर संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन गोंधळ घातला. यावेळी मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

 (नक्की वाचा - Dombivli Crime : रीलस्टार सुरेंद्र पाटीलविरोधात लैंगिक अत्याचारात गुन्हा; पुण्याच्या तरुणीसोबत काय घडलं?)

रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचं पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते. 

यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितलं. त्यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा इशारा त्यांना दिला. 

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

त्यावर या ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असं उत्तर दिलं. तेव्हा संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. तसेच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: