पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी खासदार मोहोळ आक्रमक; म्हणाले, "पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही"

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मालक संतोष कामटेसह एक मॅनेजर आणि एक कर्मचारी यांचा समावेश आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

पुण्यातील एफसी रोडवरील L3 हॉटेलमध्ये सुरु असलेल्या ड्रग्स आणि दारू पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. या पार्टीचं स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आता कारवाई सुरु केली आहे. तर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही असं कडक शब्दात म्हटलं आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत म्हटलं की, काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडीओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आले असून हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय संबंधित हॅाटेलचे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. 

(नक्की वाचा- पुण्यात पुन्हा 'उडता पंजाब', नामांकित हॉटेलमधील स्टिंग ऑपरेशन आलं समोर)

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, पुणे ड्रग्स प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. कुणी निष्काळजीपणा केला असल्यास करावाई करू. राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई होईल. 

पबविरोधात दोनदा तक्रार

धक्कादायक बाब म्हणजे दोन पालकांनी पबच्या विरोधामध्ये पोलीस आयुक्तांकडे रितसर तक्रार नोंदवली होती, अशी देखील माहिती समोर येत आहे. आमची मुलं या पबमध्ये जाऊन नको त्या गोष्टी करत आहेत, अशी तक्रार त्यांची होती. परंतु पबच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पालक आणि इतर तक्रारदारांना पब मालक संतोष कामटेने धमक्या दिल्याचं समोर येत आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- आमदाराच्या पुतण्याचा प्रताप, दोघांना चिरडले,अपघातानंतर आमदार म्हणतात...)

5 जण पुणे पोलिसांच्या ताब्यात 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मालक संतोष कामटेसह एक मॅनेजर आणि एक कर्मचारी यांचा समावेश आहे. हॉटेलच्या 3 भागिदारांनाही ताब्यात घेतलं आहे. संतोष कामठे, रवी माहेश्र्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. 

Topics mentioned in this article