Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! पावसाळ्यापूर्वी 'हे' पूल होणार खुले; BMC कडून डेडलाईन जाहीर

Mumbai News: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली असून पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सात महत्त्वाचे उड्डाणपूल खुले करण्याचे नियोजन केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, मुंबई

मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेने आता वेग घेतला आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने सात प्रमुख उड्डाणपुलांचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. विद्याविहार, सायन आणि गोरेगाव यांसारख्या महत्त्वाच्या भागांतील पुलांमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

विद्याविहार उड्डाणपुलासाठी 25 जूनची डेडलाईन

विद्याविहार पूर्व आणि पश्चिम जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे.  हा पूल लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्ग आणि चेंबूर मार्गाला जोडला जाणार आहे.  रेल्वे स्थानकावर पोहोचणे प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होईल. महापालिकेने हा पूल 25 जूनपर्यंत पूर्ण करण्याची शेवटची डेडलाईन दिली आहे.

Advertisement

सायन आणि महालक्ष्मी पुलांचे काम प्रगतीपथावर

सायन उड्डाणपूल मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा दुवा मानला जातो. याचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने 15 जुलै ही तारीख निश्चित केली आहे. तर महालक्ष्मी केबल स्टेड पूल हा महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात येणार आहे.  हा पूल मुंबई महापालिकेचा पहिला 'केबल स्टेड' पूल असणार आहे. हा रेल्वे मार्गावरील अशा प्रकारचा पहिलाच पूल असून, तो दिवाळीपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांची अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)

गोरेगाव ते दिंडोशी उड्डाणपूल

गोरेगाव ते दिंडोशी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सर्वात वेगाने सुरू असून, 31 मे पर्यंत हा पूल सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

(नक्की वाचा-  Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श)

वरळीत नवीन उड्डाणपुलाचा मानस

मुंबईतील वरळी भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नेहरू तारांगण येथे नवीन उड्डाणपूल बांधण्याचा विचार महापालिका करत आहे. या प्रस्तावावर सध्या तांत्रिक अभ्यास सुरू असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
 

Topics mentioned in this article