आंतरराष्ट्रीय पातळीवर मिडिल-ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या आणि तणावाच्या परिस्थितीचा थेट फटका आता मुंबईतील वाहनधारकांच्या खिशाला बसू लागला आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सीएनजीच्या (CNG Price Hike) किमतीत प्रति किलोग्राम 2 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील सीएनजी वितरण कंपनीने ही दरवाढ लागू केली असून, याचे नवे दर 29 मे च्या मध्यरात्रीपासून अमलात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी सिलिंडर आणि इतर इंधनाच्या दरात जागतिक घडामोडींमुळे अनिश्चितता निर्माण झाली असतानाच, आता सीएनजी देखील महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
(नक्की वाचा- Beed News: "मनोज जरांगेंचं आंदोलन 900 कोटींच्या टेंडरसाठी?" मराठा आंदोलक अमोल खुने यांचा गंभीर आरोप)
आता किती मोजावे लागणार पैसे?
सीएनजीच्या दरात 2 रुपयांच्या वाढीनंतर मुंबई आणि परिसरातील सीएनजीचे किरकोळ दर 84 रुपये प्रतिकिलोवरून 86 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
(नक्की वाचा- Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर)
टॅक्सी, ऑटो भाडेवाढ होणार?
मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर या दरवाढीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईत धावणाऱ्या बहुतांश काळ्या-पिवळ्या टॅक्सी, ऑटो रिक्षा, बेस्ट बसेस आणि व्यावसायिक मालवाहू वाहने सीएनजीवर चालतात. सीएनजी प्रति किलो 86 रुपयांवर गेल्यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी पुढे येऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world