जाहिरात

मुंबई कोस्टल रोड संपूर्ण सेवेत कधी? आता नवी तारीख, अजून किती वेळ लागणार?

संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे 2024 ची मुदत देण्यात आली होती. पण या कालावधीत तो पूर्ण होवू शकलेला नाही.

मुंबई कोस्टल रोड संपूर्ण सेवेत कधी? आता नवी तारीख, अजून किती वेळ लागणार?
मुंबई:

मुंबई कोस्टल रोड संपूर्ण पणे सेवेत येण्यासाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. या कोस्टल रोडचे  91 टक्के काम पूर्ण झालेले आहे. तर हा  संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे 2024 ची मुदत देण्यात आली होती. पण या कालावधीत तो पूर्ण होवू शकलेला नाही. त्यात आता कंत्राटदाराने 181 दिवसाची अजून मुदत वाढ  मागितली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात याबाबत मुंबई महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. त्यावेळी त्यांना हे उत्तर देण्यात आले. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे किनारा रस्ता प्रकल्प अंतर्गत प्रकल्प पूर्ण करण्याची मूळ तारीख आणि सद्यस्थितीची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिकेने त्यांना याबाबत माहिती दिली आहे. प्रकल्पाच्या भाग 4 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 25 मे 2023, 26नोव्हेंबर 2023 आणि 2 एप्रिल 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजतागायत 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लार्सन अँड टूर्बो तर्फे 23 जुलै 2024 रोजी लेखी पत्र पाठवून 181 दिवसाची मुदतवाढ मागितली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर; देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

यापूर्वी भाग 1 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 9 जून 2023, 10 सप्टेंबर 2023 आणि 22 में 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तर  भाग 2 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 15 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 6 ऑक्टोबर 2023, 7 ऑक्टोबर 2023 आणि 25 ऑक्टोबर 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातमी -  कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'

अनिल गलगली यांच्या मते 2025 पर्यंत काम पूर्ण होणार नाही. राज्य सरकारने निवडणूक लक्षात घेता घाईगडबडीत कामाचे उद्घाटन तोपर्यंत करु नये जोपर्यंत काम 100 टक्के पूर्ण होत नाही अशी मागणी त्यांनी केली आहे. जे कंत्राटदार आहेत त्यांनी मुदतवाढ मागताना आठ कारणं दर्शवली आहेत. पहिल्या पट्ट्याचे सरकारने घाईने उद्धाटन केले. त्याचे परिणाम दिसत आहेत. त्यामउळे शंभर टक्के काम होत नाही तो पर्यंत उद्घाटनाता घाट घालू नये असे ते म्हणाले आहे. त्यामुळे या कोस्टलरोडची मुंबईकरांना 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.