जाहिरात

काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमिन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गणपती दर्शनासाठी दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण

विशाल पाटील, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरु झाल्या आहेत. अनेक नेत्यांना पक्षांतर केलं आहे तर अनेकजण पक्षांतराच्या तयारीत आहेत. काँग्रेस नेते अमिन पटेल देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमिन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गणपती दर्शनासाठी दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार सागर बंगल्यावर दाखल होण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी अमिन पटेल यांनी सागर बंगल्यावर पोहोचले होते. 

(नक्की वाचा -  लोकसभा निवडणुकीतनंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'; विधानसभेसाठी इच्छूकांची रांग)

अमिन पटेल यांचं टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमिन पटेल राष्ट्रवादीत सामील होण्याची चर्चा सुरू होती. तिन्ही नेत्यांच्या भेटीमुळे या चर्चांना आणखी बळ मिळत आहे.

मी काँग्रेसमध्येच- अमिन पटेल

मात्र काँग्रेस सोडून मी कुठेही जाणार नसल्याचं अमिन पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. मी मुळचा काँग्रेस कार्यकर्ता आहे. काल, आज आणि उद्याही मी काँग्रेसमध्येच राहणार. मी काँग्रेसमधूनच निवडणूक लढणार आहे. गणपतीच्या शुभेच्छा द्यायला मी आलो होतो. परवा जो जुलूस निघणार आहे त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांच्यसोबत चर्चा करायला सांगितली आहे. 

(नक्की वाचा - कोल्हापूर-पुणे अंतर होणार कमी, वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; किती असणार तिकीट? )

कोण आहेत अमिन पटेल?

अमिन पटेल हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. अमिन पटेल मुंबादेवी मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत. 2009 ते 2014, 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 असे तीन टर्म आमदार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
लोकसभा निवडणुकीतनंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'; विधानसभेसाठी इच्छूकांची रांग
काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Sharad pawar letter to cm eknath shinde over mpsc Students demand
Next Article
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ, MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं