जाहिरात

Mumbai Accident: 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू

लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दोन दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Mumbai Accident: 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू

ऋतिक गणकवार, मुंबई

मुंबईतील पवई येथील JVLR भवानी पेट्रोल पंपजवळ आज पहाटे एक भीषण अपघात घडला. लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दोन दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात देवांश पटेल (22 वर्ष) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा (22 वर्ष) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पवई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. देवांश आणि स्वप्नील हे दोघेही एमआयडीसी, अंधेरी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(नक्की वाचा-  Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर एकही शौचालय दिसले नाही, कोर्टाने MSRTCचा खोटारडेपणा उघड केला)

नेमकं काय घडलं?

देवांश आणि स्वप्नील हे रात्री आपल्या मित्रांसोबत ॲक्टिव्हा स्कुटीने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन पहाटेच्या वेळी ते घरी परतत असताना पवईमध्ये त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने परिसरात वर्दळ कमी होती. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

(नक्की वाचा-  Palghar News: वाढवण-तवा दीड तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत! महामार्गासाठी NHAI ने निविदा मागवल्या)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी स्वप्निलला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com