जाहिरात

Mumbai Local shuttle : कल्याण-कर्जत शटल दर 4 मिनिटांनी, जीवनवाहिनी कात टाकणार; रेल्वेचा आतापर्यंतचा मोठा प्लान

पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील गर्दी दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे.लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. 

Mumbai Local shuttle : कल्याण-कर्जत शटल दर 4 मिनिटांनी, जीवनवाहिनी कात टाकणार; रेल्वेचा आतापर्यंतचा मोठा प्लान

Mumbai Local Shuttle Service : मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकलमधील गर्दी जीवघेणी ठरत आहे. दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढत असली तरी त्या तुलनेत लोकलची संख्या मात्र वाढताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी मुंब्र्यात लोकलच्या गर्दीमुळे पाच प्रवाशांचा हकनाक बळी गेला होता. यानंतर रेल्वे आणि राज्य सरकारला घेरण्यात आलं होतं. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील गर्दी दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. 

५८०० कोटींचा नवा प्रकल्प 

रेल्वेकडून येत्या पाच वर्षांचा प्लान तयार करण्यात आला असून यामध्ये लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यासह वारंवारता विढविण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात लोकलचं रुपांतर शटल सेवेत करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आल्या होत्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली होती. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार आहे. 

उपनगरीय रेल्वेचं आठ विभागात विभाजन करून गर्दीच्या वेळी दर चार मिनिटांनी एका लोकलची वारंवारता वाढविण्याचा प्लान असल्याची माहिती आहे. उपमार्गिका तयार केल्याने लोकलच्या फेऱ्या वाढविता येणार आहे.यासाठी उपमार्गिका करण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण (जलद) या विभागात कुर्ला येथे १४ आणि ठाकुर्लीत २० उपमार्गिका तयार करण्यात येणार आहे. याशिवाय २३८ लोकल रेक वाढवावे लागतील. याशिवाय नवीन फलाटांची संख्या वाढविण्यासाठी भर दिला जाणार आहे. 

Thane Metro : ठाण्यात सोमवारी मेट्रो धावणार! 'या' 10 स्टेशनवरून ट्रायल रन, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये

नक्की वाचा - Thane Metro : ठाण्यात सोमवारी मेट्रो धावणार! 'या' 10 स्टेशनवरून ट्रायल रन, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये

किती फेऱ्या वाढवणार...

सीएसएमटी - ठाणे (धीम्या) दरम्यान ३६ फेऱ्या वाढविण्यात येणार असून दर चार मिनिटाला एक लोकल सोडण्यात येईल 

ठाणे - कल्याण (धीम्या) - ५४ फेऱ्या - ४ मिनिटं

सीएसएमटी - कल्याण (जलद) - २१० फेऱ्या - ४ ते ६ मिनिटं

कल्याण ते कसारा (धीम्या) - ३२८ फेऱ्या - ४ ते ५ मिनिटं

कल्याण-कर्जत (धीम्या) २७२  फेऱ्या- ४ ते ६ मिनिटं

कर्जत-खोपोली - ८६ फेऱ्या - २० मिनिटं

कळवा/ठाणे - वाशी/नेरुळ - १३८ फेऱ्या - ६ मिनिटं

सीएसएमटी - पनवेल (धीम्या) - १६ फेऱ्या - ४ ते ६ मिनिटं


 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com