जाहिरात

Mumbai Local Train: ऐन गर्दीच्या वेळी लोकल ठप्प! CSMT वर कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन, ठाण्यातही रेल रोको

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या (Central Railway) कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात आंदोलन सुरु केले. तर ठाण्यात प्रवाशांनी रेल रोको केले.

Mumbai Local Train: ऐन गर्दीच्या वेळी लोकल ठप्प! CSMT वर कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन, ठाण्यातही रेल रोको
Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबई:

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या (Central Railway) कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात सायंकाळी 5:30 वाजल्यापासून आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबई लोकलची सेवा ठप्प झाली. यामध्ये मोटरमनसह इतर रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते.

गुरुवारी (5 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांपासून कल्याणच्या (Kalyan) दिशेने एकही लोकल या आंदोलनामुळे धावली नाही.  या आंदोलनामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर, विशेषतः सीएसएमटी (CSMT) येथे, प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Latest and Breaking News on NDTV

आंदोलनाचे कारण काय?

जून 2025 मध्ये मुंब्रा (Mumbra) रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेतून पडून झालेल्या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले होते. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर (Divisional Engineers) सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल केला आहे.

( नक्की वाचा : Pune Land Scam : पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारावर अजितदादांचा 'हात वर', दिली धक्कादायक प्रतिक्रिया )
 

अभियंत्यांवर निष्काळजीपणा आणि ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. जलद लोकलच्या दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे.

( नक्की वाचा : Mumbai Local Train: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा भयंकर फटका! मशिद बंदरजवळ लोकलनं 3 जणांना उडवलं )
 

ठाण्यातही प्रवाशांचे आंदोलन

दरम्यान, सीएसएमटी प्रमाणेच मध्य रेल्वेच्या ठाणे (Thane) स्टेशनवरही गुरुवारी आंदोलन झाले.  ठाणे  स्थानकावर 3 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी लोकल रेल्वे रोखून धरली.

Latest and Breaking News on NDTV

या आंदोलनाचे कारण सीएसएमटीकडे जाणारी लोकल पुन्हा कर्जत (Karjat) येथे वळवण्यात येत होती, ज्यामुळे प्रवाशांमध्ये संताप वाढला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com