
Mumbai Metro Latest News Update : मुंबईची लोकल ट्रेन, मोनो रेले आणि मेट्रो ट्रेन सर्वच प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते. परंतु, मागील काही दिवसांपासून मोनो रेल, मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मोनोरेल रेल्वे ट्रॅकवर अडकल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अशातच आज पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. त्यामुळे मेट्रो सेवा कोलमडली आणि प्रवाशांचे हाल झाले.या दोन्ही मार्गिका मुंबईच्या पश्चिम उपनगरात धावतात. आज संध्याकाळी गर्दीच्या वेळी या मार्गिकेवर बिघाड झाल्याने स्टेशन परिसरात प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्या. मेट्रो स्टेशनवरील प्रवाशांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, मेट्रोची सेवा आता पूर्ववत झाली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
नक्की वाचा >> आधी NSG कमांडो, राजकारणात एन्ट्री मारताच देशभर ड्रग्जचं रॅकेट पसरवलं अन् ..26/11 चा हिरो कसा बनला व्हिलन?
पॉवर फेल्युअरमुळे मेट्रो मार्गिकांवर बिघाड?
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाला होता. या दोन्ही मार्गिका मुंबईसाठी महत्त्वाचे मार्ग आहेत. पॉवर फेल्युअरमुळे मेट्रो मार्गिकांवर बिघाड झाला होता, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मुंबई लोकल आणि मेट्रोबाबत प्रवाशांची प्रचंड नाराजी आहे.
अनेकदा ट्रेन उशिराने धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. तसच मेट्रो ट्रेनमध्येही एसी बंद पडल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. मेट्रो ट्रेनमध्ये बिघाड झाल्यावर प्रवाशांची मोठी कोंडी होते आणि स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या समस्यांबाबत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात,अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
नक्की वाचा >> Video:मैदानात फक्त रवींद्र जडेजाचीच हवा! धोनीचा रेकॉर्ड मोडताच तलवारीसारखी बॅट फिरवली, सर्व खेळाडू बघतच राहिले
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) October 3, 2025
मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. काही प्रवासी तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. तर काही प्रवासी ट्रेनच्या प्रतिक्षेत असल्याचं व्हिडीओत बघू शकता. एरव्ही मेट्रो स्थानकावर लोकांची गर्दी कमी प्रमाणात असल्याचं दिसतं. पण आज मेट्रो सेवा उशिराने सुरु झाल्याने रेल्वे स्थानाकात लोकांची गर्दी वाढल्याचं समोर आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world