जाहिरात

NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती

Navi Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) नंतर मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) एक नवे आणि भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे.

NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती
Navi Mumbai International Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होईल.
मुंबई:

Navi Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) नंतर मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) एक नवे आणि भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे. 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' (NMIA) चे उद्घाटन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, या विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा डिसेंबर 2025 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे केवळ दुसरे विमानतळ नाही, तर भविष्यकालीन तंत्रज्ञान, क्षमता आणि शाश्वततेचा मेळ साधणारा हा आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

कसा आहे प्रकल्प?

उल्वे, नवी मुंबई येथे 1,160 हेक्टर (सुमारे 2,866 एकर) जमिनीवर विस्तारलेला हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर आधारित आहे. यामध्ये अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लि. ची उपकंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचा 74 टक्के तर सिडकोचा (CIDCO) 26 टक्के वाटा आहे.

विमानतळाची प्रारंभिक क्षमता दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी (MPPA) हाताळण्याची आहे. अंतिम टप्प्यात (एकूण 4 टर्मिनल्स पूर्ण झाल्यावर) ही क्षमता वाढून तब्बल 90 दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष (MPPA) इतकी होणार आहे. यासोबतच, मालवाहतूक हाताळणीची क्षमता प्रारंभिक 0.5 दशलक्ष मेट्रिक टनावरून वाढून 3.2 दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष होईल. येथे प्रत्येक 3,700m लांबीच्या दोन 'कोड एफ' अनुरूप समांतर धावपट्ट्या (Runways) तयार करण्यात आल्या आहेत.

( नक्की वाचा : Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे 'हे' लोकनेते कोण? )
 

आकर्षक डिझाईन आणि तंत्रज्ञान

  • NMIA चे स्थापत्यशास्त्र भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईनने प्रेरित आहे. प्रवाशांसाठीचा अनुभव अधिक जलद आणि संपर्क-मुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
  • येथे 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' (Digi Yatra) सुविधा उपलब्ध असेल.
  • टर्मिनल 1 मध्ये 66 चेक-इन काउंटर, 22 सेल्फ-बॅगेज ड्रॉप युनिट्स आणि 29 एरोब्रिजेसची सुविधा असेल.
  • प्रवाशांच्या सोयीसाठी 80 खोल्यांचे ट्रान्झिट/डे हॉटेल आणि 'प्राणाम' (Pranaam) सेवा उपलब्ध असेल.
  • मल्टि-मोडल कनेक्टिव्हिटी आणि ग्रीन एअरपोर्ट संकल्पना

नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम ठरणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Atal Setu), रस्ते, रेल्वे आणि मेट्रोसोबतच, हे विमानतळ वॉटर टॅक्सी सेवांनी जोडले जाईल. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) पासून हे केवळ 14 km दूर असल्यामुळे मालवाहतुकीसाठी हे एक मोठे केंद्र ठरेल.

( नक्की वाचा : Mumbai Metro 3: मुंबईची Aqua Line पूर्ण क्षमतेने सुरू होणार! पाहा स्टेशन्सचा First Look; वाचा खास वैशिष्ट्ये )
 

या प्रकल्पात शाश्वततेला (Sustainability) सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. NMIA ची योजना 'ग्रीन एअरपोर्ट' म्हणून करण्यात आली आहे, ज्यामध्ये अंतिम टप्प्यात 47MW सौर ऊर्जा निर्मितीची योजना आहे. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि टाकाऊ पाणी पुनर्वापर (Wastewater Reuse) प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. तसेच, अंतर्गत प्रवासासाठी स्वयंचलित पीपल मूव्हर्स (APMs) वापरले जातील, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com