जाहिरात

Mumbai Metro: मुंबई मेट्रो लाईन 4 साठी आणखी एक महत्वाचं पाऊल, एका रात्रीत केलं मोठं काम, पाहा Video

मुंबई मेट्रो लाईन 4 (Green Line) ही मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील कासारवडवली यांना जोडणारी आहे.

Mumbai Metro: मुंबई मेट्रो लाईन 4 साठी आणखी एक महत्वाचं पाऊल, एका रात्रीत केलं मोठं काम, पाहा Video
मुंबई:

मुंबई मेट्रो लाईन 4 साठी आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं गेलं आहे.  केवळ एका रात्रीत MMRDA च्या अभियंता पथकानं भांडुप ते सोनापूर (GMLR) जंक्शनवर 56 मीटर लांबीचा आणि 450 टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीपणे बसवला आहे. वडाळा ते कासारवडवली या मुंबई मेट्रो लाईन 4 च्या कामाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आता प्रकल्पाची एकूण प्रगती 84.5% वर पोहोचली आहे. हे महत्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्याने सर्वांनीची सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्याचा व्हिडीओ ही MMRDA ने पोस्ट केला आहे. 

अवकाळी पावसासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा अत्यंत बारकाईनं आणि अचूकपणे हे काम पार पाडण्यात आलं. दोन गर्डर असलेला हा स्टील स्पॅन 9 उच्च क्षमतेच्या क्रेन्स, 2 मल्टी-अ‍ॅक्सल पुलर्स आणि 100 हून अधिक कुशल तंत्रज्ञांच्या साहाय्यानं बसवण्यात आला. यादरम्यान मुंबईच्या वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची देखील संपूर्ण खबरदारी बाळगण्यात आली. त्यात एमएमआरडीएला यशही आलं. आणि कुठल्याही अडचणी शिवाय हे काम एका रात्रीत पूर्ण करण्यात आलं. 

नक्की वाचा - Palghar News: शेतकऱ्याची वाईट चेष्टा! विमा कंपनीने नुकसानापोटी दिले 2 रुपये 30 पैसे, मोबाईलवर मदतीचा मेसेज अन्

ही रात्रीची कामगिरी म्हणजे मुंबईला वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाच्या आणखी एका पायरीवर नेणारी उल्लेखनीय झेप आहे. #EngineeringExcellence आणि #MumbaiInMinutes या भावनेचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कामगिरी आहे. या कार्याच्या यशस्वी आणि सुरक्षित पूर्ततेसाठी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणा, विशेषतः ट्रॅफिक पोलीस विभाग, BMC आणि MSEDCL यांच्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार एमएमआरडीने मानले आहेत. शिवाय आधुनिक मुंबईची घडवणूक, एका रात्रीत स्टील स्पॅन बसवून प्रगती सुसाट असं एमएमआरडीएने म्हटले आहे. 

नक्की वाचा - Navneet Rana: नवनीत राणा पुन्हा चर्चेत! या वेळी कारण आहे त्यांची संपत्ती, आकडे पाहून डोळे फिरतील

मुंबई मेट्रो लाईन 4 (Green Line) ही मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील कासारवडवली यांना जोडणारी एक 32.32 किमी लांबीची उन्नत (elevated) मार्गिका आहे. ज्यामध्ये 30 स्थानके असतील. हा मार्ग ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवेवरून जातो आणि सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका 2 ब, 5, व 6 यांसारख्या इतर मार्गांना जोडतो. या मार्गाचा विस्तार 4A म्हणून कासारवडवली ते गायमुख पर्यंत 2.7 किमी लांबीचा आहे. ज्यामध्ये आणखी 2 स्थानके आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com