महेंद्र वानखेडे,मिरा भाईंदर
दहिसर ते काशिगाव मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्यातील मार्गीकेचे चाचणी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मेट्रोच्या माध्यमातून एम.एम.आर (मुंबई महानगर प्रदेश) क्षेत्राला एकत्रित आणण्याचे काम शासनाचे असून त्या पद्धतीने मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काशिगाव ते दहिसर या मार्गीकेची चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे एमएमआरडीकडून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व दोन्ही उपमुख्यमंत्री सहपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी काशिगाव ते दहिसर पूर्व असा मेट्रोने प्रवास करून पाहणी केली.
(नक्की वाचा- India-Pakistan Ceasefire : युद्धबंदीच्या पद्धतीवरून चीन पाकिस्तानवर नाराज? श्रेय घेण्यासाठी चढाओढ)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं की, मुंबई, ठाण्यानंतर मिरा-भाईंदर मध्ये देखील मेट्रो आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केला. अखेर मिरा-भाईंदरवासी यांचे मेट्रोचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. २०१९ मध्ये मेट्रो ९ दहिसर ते मिरा-भाईंदर या मार्गीकेचे लोकार्पण झाले. सहा वर्षानंतर पहिल्या टप्प्यातील काशिगाव ते दहिसर या मार्गीकेचे चाचणी यशस्वी पूर्ण झाली. या मार्गिकेमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
मिरा-भाईंदरमधील सुभाषचंद्र बोसपासून ते वांद्रे पर्यंत कनेक्ट करायचं आहे. त्याचे काम विविध टप्प्यात सुरू आहे.मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील मेट्रो समांतर उड्डाणपूल उभारण्यात आले आहे हे मिरा भाईंदर एम.एम. आर क्षेत्रातील पहिले शहर आहे. मेट्रो सेवा मुंबई, ठाणे सह आता भविष्यात विरारपर्यंत लवकरच सुरू होणार २०२७ पर्यंत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील मेट्रोचे जाळे पूर्ण करण्याचा मानस राज्य सरकारचा असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
(नक्की वाचा- Saamana Editorial : "सिंदूरही विकले गेले, तिरंग्याचा सौदाच झाला", भाजपच्या तिरंगा यात्रेवर 'सामना'तून घणाघात)
श्रेयवादाची लढाई
दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या चाचणीदरम्यान काशिगाव मेट्रो स्थानकाच्या बाहेर परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक तसेच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात आपापल्या नेत्याचे पोस्टर झळकल्याचे पाहायला मिळाले. कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातच श्रेयवादाची लढाई दोन्ही नेत्यांमध्ये पाहायला मिळाली.