जाहिरात
This Article is From Nov 15, 2024

Mumbai Metro Station Fire : बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, वाहतूक स्थगित

Mumbai Metro Station Fire : मुंबईत नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी मेट्रो स्टेशनला आज दुपारी (शुक्रवार, 15 नोव्हेंबर) आग लागली.

Mumbai Metro Station Fire : बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, वाहतूक स्थगित
मुंबई मेट्रो 3 मार्गाची काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Mumbai Metro Station Fire : मुंबईत नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी मेट्रो स्टेशनला आज दुपारी (शुक्रवार, 15 नोव्हेंबर) आग लागली. बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड आहे. ही आग लागल्यानंतर स्टेशनमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढलंय. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रोची वाहतूक थांबवण्यात आली आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कुठे लागली आग?

बीकेसी मेट्रो स्टेशनच्या तळघरातील लाकडी साठ आणि फर्निचरला ही आग लागली, अशी माहिती आहे. या आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आल्याचं समजतंय. 

( नक्की वाचा : पुण्यातील नगरसेवकही होता निशाण्यावर, शिवकुमारच्या चौकशीत धक्कादायक खुलासा )

बीकेसी मेट्रो स्टेशनच्या एन्ट्री/एक्झिट A4 बाहेरच ही आग लागली. त्यामुळे स्टेशनमध्ये धूर पसरला. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी मेट्रोची सेवा थांबवण्यात आली आहे. प्रवाशांनी बोर्डिंगसाठी जवळच्या वांद्रे कॉलनी स्टेशनवर जावं, तसंच मेट्रो प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com