लटकत धक्के खात मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करावा लागतो. खरा मुंबईकरच लोकल ट्रेनने प्रवास करू शकतो, बाहेरच्या व्यक्तीला लोकलमध्ये शिरताही येणार नाही असे म्हणतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात लोकल ट्रेन सेवेत मोठे बदल होतील असे सूतोवाच केले आहे. एक रुपयाचीही भाडेवाढ न करता मुंबईकरांना मेट्रोप्रमाणेच लोकलनेही आरामदायक आणि एसीतून प्रवास करता येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात मुंबईमध्ये काय बदल होतील यावर प्रकाशझोत टाकला.
नक्की वाचा: भयंकर कट,मोठं कारस्थान! भाजप नगरसेवकांच्या प्रभागातीलच मतदार यादीत घोळ? कटामागे कोण?
लोकल ट्रेनची सेवा मेट्रोसारखी आरामदायी करणार
देवेंद्र फडणवीस यांची युथ कनेक्ट (Devendra Fadnavis in IIMUN Youth Connect) कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, "उपनगरीय लोकल ट्रेन ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेनने अंदाजे 90 लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो सेवा चांगली दिली मात्र आजही लोकल ट्रेनने प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागतो. लोकल सेवेत आम्ही आमूलाग्र बदल करतो आहोत. आम्ही सगळे कोचेस मेट्रोसारखे एसी करत आहोत आणि त्यांचे दरवाजे बंद होणारे असतील. इतकी सुंदर सेवा देत असताना सेकंड क्लासचं भाडं मात्र वाढवले जाणार नाही."
मुंबईत 'पाताल लोक'
2032 पर्यंत मुंबईत सुरू असलेले सगळे विकास प्रकल्प पूर्ण होतील असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून नव्या रस्त्यांचे जाळे उभारले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यामध्ये काही बोगदेही तयार करण्यात येत असून मुंबई शहरात न येता एखाद्या व्यक्तीला नवी मुंबई किंवा वसई-विरारपर्यंत कसे पोहोचता येईल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या विकास कामांअंतर्गत खोदण्यात येत असलेल्या बोगद्यांच्या जाळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पाताल लोक' म्हणत याबद्दलची सविस्तर माहिती दिली. गर्दीच्या वेळी म्हणदेत पीक अवरला मुंबई शहरात गाड्यांचा वेग हा 20 किलोमीटर प्रति तास इतका असतो, कधी कधी तो 15 पर्यंत खाली येतो. सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा वेग 80 किलोमीटर प्रति तासापर्यंत जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा: आजी अन् वडिलांचं निधन,आईने केलं दुसरं लग्न..विद्यार्थ्यानं आश्रमशाळेतच आयुष्य संपवलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world