Metro 9 Timetable: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! मेट्रो 9 चे संपूर्ण वेळापत्रक आणि स्थानके

Mumbai Metro Line 9 Inauguration Today: मेट्रो 9 (दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर) मार्गिकेचे आज उद्घाटन होत आहे. काशीगाव ते गुंदवली (अंधेरी) दरम्यान धावणाऱ्या या मेट्रोमुळे पश्चिम उपनगरातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो 9 मार्गिकेचे आज उद्घाटन होत असून, यामुळे दहिसर आणि मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांचा अंधेरीपर्यंतचा प्रवास अत्यंत सोपा आणि जलद होणार आहे. काशीगाव ते गुंदवली (अंधेरी) दरम्यान ही सेवा आजपासून प्रवाशांसाठी खुली करण्यात येत आहे.

मेट्रो 9 चे वेळापत्रक 

प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाने पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गाड्यांचे नियोजन केले आहे.

  • पहिली गाडी: पहाटे 5:50 वाजता (काशीगाव ते गुंदवली)
  • शेवटची गाडी: रात्री 11 वाजता
  • गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल, तर इतर वेळी 8 ते 10 मिनिटांच्या अंतराने गाड्या धावतील.

(नक्की वाचा-  Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)

मेट्रो 9 ची महत्त्वाची स्थानके 

  1. दहिसर पूर्व (कनेक्टिव्हिटी पॉईंट)
  2. पांडुरंगवाडी
  3. मिरागाव
  4. काशीगाव
  5. साईबाबा नगर
  6. मेडतिया नगर
  7. शहीद भगत सिंग गार्डन
  8. सुभाषचंद्र बोस स्टेडियम

मेट्रो लाईन 2B (टप्पा-1)

  • टप्प्याची एकूण लांबी-  5.38 किमी
  • पहिली मेट्रो- सकाळी 6 वाजता 
  • शेवटची मेट्रो- रात्री 10.15 आणि रात्री 10.30 
  • दर 9 मिनिट 30 मिनिटांनी एक मेट्रो धावणार  

मेट्रोच्या एकूण फेऱ्या- 209

प्रवाशांना मिळणारे फायदे

रस्ते मार्गावरील ट्रॅफिकमधून सुटका होऊन प्रवासाचा वेळ कमी होईल. काशीगाव आणि मिरा रोड परिसरातील नागरिक थेट मेट्रो 7 द्वारे अंधेरी गुंदवलीपर्यंत विनाअडथळा पोहोचू शकतील. मेट्रोमुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषणात घट होण्यास मदत होईल.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? चौकशीत खळबळजनक खुलासा)

मुंबईतील मेट्रोचं जाळं

  • मेट्रो लाईन 1 (ब्लू लाईन): वर्सोवा ते घाटकोपर
  • मेट्रो लाईन 2A (यलो लाईन): दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पश्चिम)
  • मेट्रो लाईन 2B (यलो लाईन): डी.एन. नगर ते मंडाले
  • मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन): कफ परेड ते आरे जे.व्ही.एल.आर.
  • मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन): वडाळा ते कासारवडवली (ठाणे)
  • मेट्रो लाईन 5 (ऑरेंज लाईन): ठाणे ते कल्याण
  • मेट्रो लाईन 6 (पिंक लाईन): स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते विक्रोळी (ईईएच)
  • मेट्रो लाईन 7 (रेड लाईन): दहिसर (पूर्व) ते गुंदवली (अंधेरी पूर्व)
  • मेट्रो लाईन 7A (रेड लाईन): गुंदवली ते सीएसएमआय विमानतळ (CSMIA)
  • मेट्रो लाईन 9 (रेड लाईन): दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर
  • मेट्रो लाईन 10 (ग्रीन लाईन): गायमुख (ठाणे) ते शिवाजी चौक (मीरा रोड)
  • मेट्रो लाईन 11 (ग्रीन लाईन): वडाळा ते सीएसएमटी (CSMT)
  • मेट्रो लाईन 12 (ऑरेंज लाईन): कल्याण ते तळोजा
Topics mentioned in this article