मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो 9 मार्गिकेचे आज उद्घाटन होत असून, यामुळे दहिसर आणि मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांचा अंधेरीपर्यंतचा प्रवास अत्यंत सोपा आणि जलद होणार आहे. काशीगाव ते गुंदवली (अंधेरी) दरम्यान ही सेवा आजपासून प्रवाशांसाठी खुली करण्यात येत आहे.
मेट्रो 9 चे वेळापत्रक
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाने पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गाड्यांचे नियोजन केले आहे.
- पहिली गाडी: पहाटे 5:50 वाजता (काशीगाव ते गुंदवली)
- शेवटची गाडी: रात्री 11 वाजता
- गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल, तर इतर वेळी 8 ते 10 मिनिटांच्या अंतराने गाड्या धावतील.
(नक्की वाचा- Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)
मेट्रो 9 ची महत्त्वाची स्थानके
- दहिसर पूर्व (कनेक्टिव्हिटी पॉईंट)
- पांडुरंगवाडी
- मिरागाव
- काशीगाव
- साईबाबा नगर
- मेडतिया नगर
- शहीद भगत सिंग गार्डन
- सुभाषचंद्र बोस स्टेडियम
मेट्रो लाईन 2B (टप्पा-1)
- टप्प्याची एकूण लांबी- 5.38 किमी
- पहिली मेट्रो- सकाळी 6 वाजता
- शेवटची मेट्रो- रात्री 10.15 आणि रात्री 10.30
- दर 9 मिनिट 30 मिनिटांनी एक मेट्रो धावणार
मेट्रोच्या एकूण फेऱ्या- 209
प्रवाशांना मिळणारे फायदे
रस्ते मार्गावरील ट्रॅफिकमधून सुटका होऊन प्रवासाचा वेळ कमी होईल. काशीगाव आणि मिरा रोड परिसरातील नागरिक थेट मेट्रो 7 द्वारे अंधेरी गुंदवलीपर्यंत विनाअडथळा पोहोचू शकतील. मेट्रोमुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषणात घट होण्यास मदत होईल.
(नक्की वाचा- Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? चौकशीत खळबळजनक खुलासा)
मुंबईतील मेट्रोचं जाळं
- मेट्रो लाईन 1 (ब्लू लाईन): वर्सोवा ते घाटकोपर
- मेट्रो लाईन 2A (यलो लाईन): दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पश्चिम)
- मेट्रो लाईन 2B (यलो लाईन): डी.एन. नगर ते मंडाले
- मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन): कफ परेड ते आरे जे.व्ही.एल.आर.
- मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन): वडाळा ते कासारवडवली (ठाणे)
- मेट्रो लाईन 5 (ऑरेंज लाईन): ठाणे ते कल्याण
- मेट्रो लाईन 6 (पिंक लाईन): स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते विक्रोळी (ईईएच)
- मेट्रो लाईन 7 (रेड लाईन): दहिसर (पूर्व) ते गुंदवली (अंधेरी पूर्व)
- मेट्रो लाईन 7A (रेड लाईन): गुंदवली ते सीएसएमआय विमानतळ (CSMIA)
- मेट्रो लाईन 9 (रेड लाईन): दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर
- मेट्रो लाईन 10 (ग्रीन लाईन): गायमुख (ठाणे) ते शिवाजी चौक (मीरा रोड)
- मेट्रो लाईन 11 (ग्रीन लाईन): वडाळा ते सीएसएमटी (CSMT)
- मेट्रो लाईन 12 (ऑरेंज लाईन): कल्याण ते तळोजा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world