Mumbai News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणी पातळी कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 15 मे पासून शहरात 20 टक्के पाणी कपात लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज या संदर्भात माहिती दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा सध्या 28 टक्क्यांवर आला आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध पाणीसाठा 17 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, पालिकेने राज्य शासनाकडे अतिरिक्त पाणीसाठ्याची मागणी केली आहे. जर शासनाने हा अतिरिक्त साठा उपलब्ध करून दिला, तर पाणी टंचाईवर मात करणे सोपे होईल. जर राज्य सरकारकडून अतिरिक्त पाणी मिळाले नाही, तर सध्याचा साठा 6 जुलैपर्यंतच पुरेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)
पाण्याचे नियोजन
15 मे पासून 10 टक्के पाणी कपात केली जाईल, ज्यामुळे शहराच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. मुंबईला दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त साठा मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Crime News: सोनं-चांदी, पैशांना हातही लावत नाही; घरातील फक्त एक वस्तू चोरतोय हा चोर; पोलीसही चक्रावले)
'एल निनो'चा मान्सूनवर परिणाम
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे नैऋत्य मान्सून कमकुवत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. साधारणपणे जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाने ऑगस्टपर्यंत तलाव पूर्ण भरतात. मात्र, यंदा पाऊस लांबणीवर पडल्यास सध्याचा साठा केवळ जुलै अखेरपर्यंतच पुरेल. पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे संकट येऊ नये, यासाठी सध्याच्या साठ्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.