जाहिरात

Crime News: सोनं-चांदी, पैशांना हातही लावत नाही; घरातील फक्त एक वस्तू चोरतोय हा चोर; पोलीसही चक्रावले

अजमेरच्या किशनगडमध्ये एका विचित्र चोरट्याने पोलीस आणि नागरिकांना चक्रावून सोडले आहे. या चोरट्याने मौल्यवान ऐवजाऐवज सोडून केवळ महागड्या आणि आवडत्या बुटांना लक्ष्य केले आहे.

Crime News: सोनं-चांदी, पैशांना हातही लावत नाही; घरातील फक्त एक वस्तू चोरतोय हा चोर; पोलीसही चक्रावले

घरफोडीदरम्यान चोर घरातील मौल्यवान जसं की सोने-चांदी, रोख रक्कम अशांवर डल्ला मारतात. मात्र, अजमेरमधील किशनगडमध्ये असा एक चोर समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे. मौल्यवान वस्तू असूनही या चोराने केवळ 'बूट' चोरी करण्यावर भर दिला आहे. 

बूट घालून पाहतो मग चोरतो

किशनगडमधील अग्रसेन नगर आणि श्रीकरणी इन्द्र विहार परिसरात ही विचित्र घटना घडली आहे. चोर मध्यरात्री घराबाहेर किंवा घरात ठेवलेल्या बुटांवर डल्ला मारतो. तो शांतपणे घरात घुसतो, तिथल्या बुटांची पाहणी करतो, ते घालून 'ट्रायल' घेतो आणि जे आवडतात तेच आपल्यासोबत नेतो. विशेष म्हणजे, तो फक्त चोरी करत नाही, तर एखाद्याच्या घराबाहेरचे बूट दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकतो. सकाळी उठल्यावर लोकांना आपल्या दारात अनोळखी बूट आणि स्वतःचे बूट गायब असल्याचे पाहून धक्काच बसतो.

(नक्की वाचा-  VIDEO: पुण्यात वसुलीवरून राडा! हडपसरमध्ये भररस्त्यात एजंट आणि ग्राहकाची हाणामारी)

सीसीटीव्हीमध्ये 'चोर' कैद

या प्रकरणाने परिसरात दहशतीसोबतच चर्चेलाही उधाण आले आहे. परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एक संशयास्पद व्यक्ती रात्रीच्या वेळी घराबाहेर फिरताना आणि बुटांची तपासणी करताना स्पष्ट दिसत आहे.  काही महागड्या वस्तू चोरीला गेल्या नसल्या, तरी अनोळखी व्यक्ती रात्री घरात शिरत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आता त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या विचित्र चोराचा शोध घेत आहेत.

(नक्की वाचा-  Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)

'फेटिश' की मानसिक विकृती?

स्थानिक रहिवाशांच्या मते, हा केवळ चोरीचा प्रकार नसून एखाद्या मानसिक विकृतीचा किंवा 'फेटिश'चा भाग असू शकतो. कोणताही चोर फक्त बुटासाठी आपला जीव धोक्यात का घालेल? या प्रश्नाने पोलीसही हैराण झाले आहेत. पोलीस सध्या संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवत असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांना आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com