जाहिरात

Mumbai News: कोर्टात हजर झाला, मग जेलमध्ये जाताना मोठा कांड केला, न्यायालयाच्या आवारात फिल्मीस्टाईल थरार

पोलिसांचे पथक दुसऱ्या मजल्यावर पोहोचले असता, आरोपी हॅरिसनने पोलीस कर्मचाऱ्याला अचानक जोराचा धक्का दिला.

Mumbai News: कोर्टात हजर झाला, मग जेलमध्ये जाताना मोठा कांड केला, न्यायालयाच्या आवारात फिल्मीस्टाईल थरार
AI Image
  • दक्षिण मुंबईतील कुलाबा सत्र न्यायालयात गुन्हेगार हॅरिसन अँथनी जोसेफ पोलिसांच्या तावडीतून पळून गेला
  • आरोपी हॅरिसन याच्यावर खुनाचा प्रयत्न व संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये आधीच आरोप असून त्याचा शोध घेतला जात आहे
  • पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कांबळे याने आरोपीला न्यायालयीन सुनावणीसाठी आणले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील सत्र न्यायालयातून मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी हॅरिसन अँथनी जोसेफ (वय 42) हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. त्याने मोठ्या चलाखीने पोलीसांनी गुंगारा दिला. कुणाच्या काही लक्षात येण्याच्या आता तो कोर्ट परिसरातून दिसेनासा झाला. त्यामुळे पोलीसांची एकच धांदल उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:10 ते 2:20 च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत श्रीमंत कांबळे (वय 28) हे आरोपी हॅरिसनला सुनावणीसाठी आर्थर रोड कारागृहातून सत्र न्यायालयात घेवून आले होते. त्याला कोर्टरूम क्रमांक 10 मध्ये हजर ही करण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, हॅरिसनसह इतर चार आरोपींना न्यायालयाच्या लॉकअपमध्ये नेण्यासाठी पोलीस पथक तिसऱ्या मजल्यावरून खाली येत होते. याच वेळी आरोपी हॅरिसने संधी साधली. 

नक्की वाचा - Pune News: आनंदाच्या सहलीचा भीषण शेवट! वॉटरपार्कच्या स्लाइडनं महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त, भयंकर घडलं

पोलिसांचे पथक दुसऱ्या मजल्यावर पोहोचले असता, आरोपी हॅरिसनने पोलीस कर्मचाऱ्याला अचानक जोराचा धक्का दिला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलिसांची पकड ढिली होताच त्याने तेथून पळ काढला. या घटनेची औपचारिक नोंद त्याच दिवशी सायंकाळी 5:00 वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिवाय त्याला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत. 

नक्की वाचा - Sharad Pawar: अशोक खरातबाबतचा प्रश्न अन् शरद पवारांनी सांगितली आतली गोष्ट, सर्वांच्याच भुवया उंचावल्या

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक तातडीने न्यायालयात दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सीसीटीव्ही मध्ये आरोपी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पळताना स्पष्ट दिसत आहे. आरोपीवर यापूर्वीच हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.सध्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. आरोपी रेल्वेने पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचे एक पथक कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) कडे रवाना झाले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com