
कुणी घर बांधून देता का घर. असा प्रश्न न विचारता मुंबईकर आता स्वतःच्या घरांसाठी स्वतःच कामाला लागले आहेत. सेल्फ रिडेव्हलपमेंट, मुंबईतला हा नवा ट्रेंड आहे. साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बिल्डिंग जुनी झाल्यावर त्या बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डर्सचे उंबरे न झिजवता त्या सोसायट्यांनी स्वतःच नवी बिल्डिंग बांधायची. मुंबईत सध्या अशा बिल्डिंग तयार सुद्धा झाल्या आहेत. मुंबईकरांना या स्वयंपुनर्विकासासाठी मुंबै बँकेकडून आर्थिक मदत केली जात आहे. मुंबईतल्या सेल्फ रिडेव्हलपमेंटला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं बँकेचं म्हणणं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या मुंबै बँकेकडे सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जवळपास 1600 अर्ज आलेत. आणखी 4000 सोसायट्या यासंदर्भात बँकेशी चर्चा करत आहेत. आतापर्यंत सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी मुंबै बँकेकडून एक हजार कोटींचं कर्ज देण्यात आलं आहे. याहून अधिक कर्जपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात केंद्राशी बोलणी सुरू आहेत. मुंबै बँकेनं सेल्फ रिडेव्हलपमेंटसंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एक विशेष कक्षही सुरू केला आहे.
स्वयंपुनर्विकास प्रकल्प म्हणजे सोसायटीमधले सदस्य स्वतःच्या मालकीच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी एकत्र येतात.
कुठल्याही बिल्डरवर अवलंबूनव न राहता स्वतःच्या सोयीनुसार गरजांनुसार बांधकाम केलं जातं. या प्रक्रियेत संस्थेतले सदस्य एकत्र येऊन योजना आखतात. बांधकाम करतात आणि व्यवस्थापनाची जबाबदारी घेतात. स्वयंपुनर्विकासामुळे सदस्यांना बिल्डिंग कशी बांधायची यासंदर्भात सर्वाधिकार असतात. स्वयंपुनर्विकासामध्ये बिल्डरऐवजी सोसायटीला नफा मिळतो. बांधकाम आणि व्यवस्थापन तज्ञांची मदत घेऊन सेल्फ रि डेव्हलपमेंट करणं सोपं होतं.
ट्रेंडिंग बातमी - अडीच वर्षात 25 वेळा आई बनली महिला! 5 वेळा झाली नसबंदी, वाचा काय आहे प्रकार?
मुंबईत 30 वर्षांपेक्षा जास्त जुनी किंवा जीर्ण इमारत पुनर्विकासासाठी पात्र ठरू शकते. देवेंद्र फडणवीसांनी या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेला खऱ्या अर्थानं गती दिली. काही बिल्डर्स पुनर्विकासामध्ये फसवणूक करतात. तसंच बऱ्याच बिल्डर्सचे पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षं रखडतात. प्रकल्प वर्षानुवर्षं रखडल्यानं रहिवाशांना हक्काचं घर मिळत नाही. आर्थिक ताणही पडतो. हे सगळं टाळायचं असेल तर सेल्फ रि डेव्हलपमेंट हा उत्तम पर्याय आहे.
Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं!
ज्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांना सेल्फ रिडेव्हलपमेंटची परवानगी आहे. योग्यं कागदपत्रं सादर केल्यावर आणि योग्य बँकांकडून कर्ज घेतल्यावर ही प्रक्रिया सोपी होते. महाराष्ट्र सरकारच्या सिंगल-विंडो क्लिअरन्स सिस्टीमचा फायदा घेऊन मंजुरी प्रक्रिया सुरू करता येते. त्यामुळेच बिल्डरवर अवलंबून न राहता स्वतःचं घर स्वतःला हवं तसं बांधण्याची मुंबईकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world