जाहिरात

मुंबई एयरपोर्टवर 10 तास थांबली पाकिस्तानी महिला, संशयास्पद वस्तू आढळली; VIRAL VIDEOला मिळाले 1 Million Views

Video: लंडनहून नेपाळला जाणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेचा मुंबई विमानतळावरील 10 तासांचा अनुभव सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई एयरपोर्टवर 10 तास थांबली पाकिस्तानी महिला, संशयास्पद वस्तू आढळली; VIRAL VIDEOला मिळाले 1 Million Views
"Mumbai News: पाकिस्तानी महिलेचा व्हिडीओ होतोय व्हायरल"

Mumbai News: कधीकधी प्रवासातील छोटे छोटे क्षणही आयुष्यभरासाठी आठवणी होऊन जातात. असंच काहीसं एका पाकिस्तानी महिलेसोबत घडलं, जिचा मुंबईतील 10 तासांचा ले-ओव्हर एक खास अनुभव ठरला. भीती आणि चिंतेने सुरू झालेला हा प्रवास अखेर आनंद आणि कौतुकात बदलला, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

10 तासांचा लेओव्हर ठरला खास अनुभव

एक पाकिस्तानी महिला लंडनहून नेपाळला जात होती आणि तिची कनेक्टिंग फ्लाइट मुंबईतून होती. या प्रवासादरम्यान तिला सुमारे 10 तासांचा ले-ओव्हर मिळाला. तिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, ती या ट्रान्झिटबाबत सुरुवातीला खूप घाबरलेली होती, कारण पाकिस्तानी पासपोर्टसह भारतात थांबण्याचे नियम वेगळे असतात. या महिलेने आधीच पूर्ण तयारी केली होती. तिने एक महिना आधी इंडिगो एअरलाइन्सशी संपर्क साधला आणि आपण विमानतळाबाहेर न पडता ट्रान्झिट करू शकतो का? याची खात्री करून घेतली. एअरलाइनने तिला सांगितले की, जर लेओव्हर 24 तासांपेक्षा कमी असेल आणि प्रवासी विमानतळाबाहेर जात नसेल, तर ट्रान्झिट शक्य आहे.

पाहा व्हिडीओ 

विमानतळावर मिळाला आराम आणि चांगली वागणूक

मुंबईच्या इंटरनॅशनल टर्मिनलवर या महिलेने आपला वेळ आरामात घालवला. तिने तिथे जेवण केले, विश्रांती घेतली आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचे भरभरून कौतुक केले. महिला म्हणाली की, तिचा अनुभव अप्रतिम होता आणि तिला विश्वासच बसत नव्हता की तिने मुंबई पाहिली, मग ती थोड्या वेळासाठी आणि दुरून का असेना. दरम्यान एक छोटीशी घटनाही घडली जेव्हा सुरक्षा रक्षकांनी तिच्या बॅगेतील एका संशयास्पद वस्तूबाबत विचारपूस केली. नंतर समजले की तो एक पॉवर बँक होती, जी नियमांनुसार कॅबिन बॅगेत ठेवणे आवश्यक असते.

(नक्की वाचा: जबरदस्त! अस्सा प्लान आखला... 80 लाखांचं कर्ज 12 महिन्यात फेडलं; तरुणीने सर्वांनाच केलं हैराण!)

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हा व्हिडीओ 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून हजारो लाइक्सही मिळाले आहेत. कमेंट्समध्ये लोकांनी महिलेच्या अनुभवाचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, "तुमचा अनुभव चांगला राहिला हे ऐकून आनंद झाला, अशा खऱ्या अनुभवांच्या आशयाची गरज आहे." दुसऱ्या एका युजरने माहिती देताना सांगितले की, "भारतात पॉवर बँक फक्त कॅबिन बॅगेतच ठेवता येतो." तर एका युजरने गमतीने म्हटले की, "मुंबईत आला होतात तर वडापाव नक्कीच ट्राय करायला हवा होता!"

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com