जाहिरात

Missing Link News : मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा श्वास मोकळा, 'या' घाटाचा प्रवास टाळता येणार

खालापूर ते कुसगाव दरम्यानच्या या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे बोरघाटातील कठीण वळणे आणि तीव्र चढ-उतारांचा प्रवास आता टाळता येणाप आहे.

Missing Link News : मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा श्वास मोकळा, 'या' घाटाचा प्रवास टाळता येणार
Mumbai Pune Missing Link Latest News
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Mumbai-Pune Expressway Missing Link Latest News : यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग  आणि वाहतूक कोंडी हे गेल्या अनेक वर्षांचे समीकरण आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे इतिहास जमा होताना दिसत आहे. शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगांनी गजबजणाऱ्या या महामार्गाने आज मोकळा श्वास घेतला असून बोरघाटातील वाहतूक अत्यंत सुरळीत आणि वेगवान असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे.

प्रवासाचा वेळ आणि अंतर घटले

खालापूर ते कुसगाव दरम्यानच्या या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे बोरघाटातील कठीण वळणे आणि तीव्र चढ-उतारांचा प्रवास आता टाळता येणाप आहे.नवीन बोगद्यांमुळे आणि पुलांमुळे प्रवासाचे अंतर जवळपास 6 किलोमीटरने कमी झाले असून वेळेतही 20 ते 25 मिनिटांची बचत होत आहे. याचा थेट परिणाम शनिवारच्या वीकेंड ट्रॅफिकवर झाला असून आज सकाळपासूनच वाहने कोणतीही अडचण न येता मार्गस्थ होत आहेत.

नक्की वाचा >>  Shirdi News: 'या' विद्यार्थ्याच्या SSC निकालाची महाराष्ट्रभर चर्चा, 6 विषयातील मार्क्स पाहून टॉपरही झाले थक्क

बोरघाटातील कोंडीतून सुटका

पूर्वी घाटातील अरुंद रस्ते आणि अवजड वाहनांमुळे एका वाहनाचा बिघाड झाला तरी संपूर्ण महामार्ग ठप्प व्हायचा.विशेषतः अमृतांजन पुलाजवळ होणारी कोंडी प्रवाशांची डोकेदुखी ठरत होती.मात्र,मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध झाल्याने मुख्य प्रवाहात येणाऱ्या वाहनांची विभागणी झाली आहे.आज शनिवार असूनही पर्यटकांच्या आणि मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या खासगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे,तरीही कुठेही वाहनांचा वेग मंदावलेला नाही.

नक्की वाचा >> Nida Khan: 42 दिवसांपासून गुंगारा देणारी निदा खान कशी सापडली? AIMIM चा 'तो' नेता कसा अडकला? वाचा आतली खबर

प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

दर शनिवारी मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा घाटात किमान 1 तास तरी अडकून राहावे लागायचे.मात्र,आज आम्ही अवघ्या काही मिनिटांत घाट पार केला,अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.मिसिंग लिंक प्रकल्प हा केवळ रस्ता नसून पुणे-मुंबई प्रवासातील एक आधुनिक क्रांती ठरत आहे.आजच्या सुरळीत वाहतुकीमुळे एमएसआरडीसी (MSRDC)आणि पोलीस प्रशासनावरचा ताणही बऱ्याच अंशी हलका झाला आहे.यामुळे येणाऱ्या काळात हा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल,यात शंका नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com