
मुंबई –पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव दशपुते हे अधिकारी उपस्थित होते. या मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेशही शिंदे यांनी यावेळी या बैठकीत दिले. या मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जवळपास 13 कि.मी. लांबीच्या मिसिंग लिंकच्या पॅकेज एक आणि दोनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. या शेवटचा टप्पा म्हणून सर्वाधिक उंचीचे पुलाचे काम सध्या सुरू आहे. हवेचा दाब आणि पुलाचे काम याची सातत्याने चाचणी करीत काम सुरू आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासात अजून 20 ते 25 मिनीटांची बचत होणार आहे. त्याचे काम करताना कुठलीही तडजोड करू नका. उंचीवरील काम करताना अधिक काळजीपूर्वक करा. कामाची प्रत्येक पातळीवर चाचणी करीत जा, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world