जाहिरात

Mumbai - Pune Travel : मुंबई-पुणे फक्त 30 मिनिटांत ! काय आहे प्रवासाचा नवा पर्याय? वाचा सर्व माहिती

Mumbai Pune Travel :  मुंबई - पुणे प्रवास आता फक्त अर्ध्या तासांमध्ये होणार आहे. त्यामुळे तुमचा प्रवासाचा 3 ते 4 तासांचा वेळ वाचणार आहे.

Mumbai - Pune Travel : मुंबई-पुणे फक्त 30 मिनिटांत ! काय आहे प्रवासाचा नवा पर्याय? वाचा सर्व माहिती
Mumbai - Pune Travel : एक जलद, सोपा आणि अधिक आरामदायक मार्ग उपलब्ध झाला आहे.
मुंबई:

Mumbai Pune Travel :  मुंबई आणि पुणे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील दोन महत्त्वाची शहरं. औद्योगिक आणि आर्थिक दृष्टीनं ही दोन्ही शहरं संपूर्ण देशासाठी महत्त्वाची आहेत. या दोन शहरांमधील प्रवास फास्ट करण्यासाठी 'एक्स्प्रेस वे' ची निर्मिती करण्यात आली. पण,या मार्गावरही ट्रॅफिक जामचा अनुभव हा नवा राहिलेला नाही. या ट्रॅफिकमुळे तीन तासांच्या या प्रवासाला पाच ते सहा तास लागतात. 

आता कल्पना करा, हाच प्रवास केवळ 30 मिनिटांत, कोणतीही गर्दी नाही, हॉर्नचा आवाज नाही आणि महामार्गाला स्पर्शही नाही. हे अशक्य वाटत असलं तरी, ते आता खऱ्या आयुष्यात घडत आहे. FlyBlade-शैलीतील हेलिकॉप्टर शटल सेवा आणि Flyyo India च्या नव्या ऑफरमुळे महाराष्ट्रातील या दोन गजबजलेल्या शहरांदरम्यान प्रवास करण्याचा एक जलद, सोपा आणि अधिक आरामदायक मार्ग उपलब्ध झाला आहे.

कसा होणार हा प्रवास?

या प्रवासाची संकल्पना खूपच सोपी आहे. रस्त्याने 150 किलोमीटरहून अधिक अंतर कापण्याऐवजी किंवा विमानतळावरील किचकट प्रक्रियेत वेळ घालवण्याऐवजी, प्रवासी मुंबईतील निश्चित हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरमध्ये बसतील आणि अंदाजे अर्ध्या तासाच्या आत पुण्यात उतरतील. यामुळे तुमचा प्रवासाचा 3 ते 4 तासांचा वेळ वाचणार आहे.

( नक्की वाचा : Latur-Mumbai : लातूरहून निघा अन् 5 तासात मुंबई गाठा! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा Exclusive Video )

काय आहे तिकीट दर?

हा प्रवास निश्चितपणे 'प्रीमियम' आहे. सध्याच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका सीटसाठी तिकीट दर अंदाजे 15,000 रुपये असेल. यापूर्वी काही खासगी चार्टर ऑपरेटर याच मार्गासाठी 19,900 रुपये (अधिक कर) इतके दर आकारात होते.

या सेवेसाठी Airbus H125 हे हेलिकॉप्टर वापरले जात आहे. हे एक हलके आणि सिंगल-इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, ज्यामध्ये एका पायलटसह जास्तीत जास्त 6 प्रवासी बसू शकतात. 

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )

कुणासाठी आहे ही शटल सेवा?

हा पर्याय सर्वसामान्य प्रवाशांसाठी किंवा नियमित रेल्वे प्रवासाची जागा घेण्यासाठी नाही. परंतु, वेळ वाचवणे ज्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, त्यांच्यासाठी हे वरदान ठरू शकते.

व्यावसायिक आणि उद्योजक: ज्यांना मीटिंग्ससाठी सतत दोन्ही शहरांमध्ये प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी वाचलेला वेळ हा सर्वात मोठा फायदा आहे. पूर्वी ज्या प्रवासात अर्धा दिवस जायचा, तो आता तुमचा एखादा पॉडकास्ट एपिसोड संपायच्या आत पूर्ण होऊ शकतो.

  • एकाच दिवशी दोन्ही शहरांमध्ये मीटिंग असलेले लोक
  • ट्रॅफिक टाळू इच्छिणारे विक-एंड ट्रॅव्हलर्स
  • वेळेला खर्चापेक्षा अधिक महत्त्व देणारे प्रवासी

कसे करणार बुकिंग?

तुम्ही ऑपरेटरच्या वेबसाइट किंवा ॲपद्वारे सीट बुक करू शकता. तुम्ही विमानाचे तिकीट बुक करता तशीच ही देखील पद्धत आहे. 

या सेवेला काही मर्यादा देखील आहेत

सामान मर्यादा:  सामानाची अनुमती खूपच कमी असते.
हवामानाचा परिणाम:  खराब हवामानामुळे वेळेत बदल होऊ शकतो.
सीट क्षमता:  सीटची संख्या मर्यादित असते (जास्तीत जास्त 6).
वेळेची मर्यादा:  ही सेवा फक्त दिवसाच्या वेळीच (Daylight Hours) उपलब्ध आहे.

परंतु, जे प्रवासी लांब एअरपोर्ट रांगा किंवा एक्स्प्रेस-वे वरील थकव्याला कंटाळले आहेत, त्यांच्यासाठी या सर्व मर्यादा स्वीकारार्ह वाटू शकतात.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com