तुम्ही जर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर बसविण्यासाठी तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईवरून पुण्याला येताना एक्स्प्रेस हायवेवर पुणे लेनवर लोणावळा येथे डोंगरगाव/कुसगांव येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ही जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोड मार्गे वळविण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Paragliding Death : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू, पायलटही दगावला!
- दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान तुम्ही वाळवण ते वरसोली टोलनाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाऊ शकता.
- पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत असणार आहे.
- काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी तीननंतर पुन्हा तुम्ही या महामार्गावरून आपला प्रवास करू शकता.
- ब्लॉक दरम्यान कुठलीही अडचण आल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822498224 या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world