
पावसाने मुंबईत दमदार कमबॅक केलं. मात्र त्याने मुंबईमध्ये चांगलीच दाणादण उडाली. शाळांना सुट्टी द्यावी लागली. अनेकांची सुट्टी झाली. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना ही संध्याकाळी चारनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळ पासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी तुंबल्याची दिसली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आढावा घेतला. शिवाय मुंबईची नक्की स्थिती काय आहे याची माहिती त्यांनी माध्यमाना दिली. शिवाय सर्वांनाच काळजी घेण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई बाबत किती पाऊस पडला याची माहिती सर्वात आधी दिला. आज सकाळी सात वाजण्याच्या आत 48 तासात 200 मिलीमिटर पावसाची नोंद झाल्याचं त्यांनी सांगितलं. सकाळी सहा ते आठ या दोन तासात तब्बल 1700 मिली मिटर पावसाची नोंद झाल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत सर्वाधिक पाऊस हा चेंबूर भागात झाला.मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत पाऊस झाला की पाणी साचणं हे नित्याचचं झालं आहे. त्यामुळे या पावसातही मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईत एकूण 14 ठिकाणी पाणी साचल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यात अंधेरी, वडाळा, चुनाभट्टी, परळ, अंधेरी सब-वे, कुर्ला या ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे फक्त दोन ठिकाणचे ट्रॅफिक थांबवण्यात आलं आहे. बाकी संपूर्ण शहरात स्लो ट्रॅफिक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या स्लो ट्रॅफिकमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी ही दिसून येत आहे.

रोड ट्रॅफिक प्रमाणे मुंबई लोकलसेवेवरही पावसाचा परिणाम होता. त्याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे बंद झालेल्या नाहीत. त्या धीम्या गतीने सुरू आहेत. त्या लेट आहेत पण सुरू असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान डॉपलरने दिलेल्या माहिती नुसार मुंबईत 10 ते 12 तास तिव्र पाऊस होणार आहे. त्यामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांना चारनंतर घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे असं ही त्यांनी सांगितलं.

आज हाय टाईड आहे. त्यामुळे समुद्राला उधाण येणार आहे. यावेळी तीन मिटरपर्यंत लाटा उसळणार आहेत. उद्या हायटाईड वेळी चार मिटरपर्यंत लाटा उसळतील असं मुख्यमंत्री म्हणाले. या काळा समुद्रापासून दुर राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. भरतीच्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे. भरती वेळी समुद्र आणि नाल्यांची पातळी सारखी असणार आहे. अशा वेळी पंम्पींगची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान पावसाची स्थिती काय असेल हे पाहून उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही याची निर्णय संध्याकाळी सहानंतर घेतला जाणार आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world