Maharashtra Rain : यंदा पावसाबरोबरच थंडीही जरा लवकरच आली आहे. हवामानात होणाऱ्या बदलामुळे आता पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरात थंडी वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
पावसाचा इशारा
हिमालयातील बर्फवृष्टी, उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील थंडीचा पारा वाढला आहे. मात्र येत्या काही दिवस 'थंडीचे दिवस' होल्डवर जाऊन पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. २२ नोव्हेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
छत्रपती संभाजीनगर
बीड
हिंगोली
जालना
लातूर
नांदेड
परभणी
धाराशिव
नागपूर
वर्धा
भंडारा
गोंदिया
चंद्रपूर
गडचिरोली
अमरावती
अकोला
बुलढाणा
वाशिम
यवतमाळ
नाशिक
पालघर
कोणत्या जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता (१८ नोव्हेंबर)
धुळे
नंदुरबार
जळगाव
नाशिक
नाशिक घाट परिसर
छत्रपती संभाजीनगर
जालना
परभणी
बीड
हिंगोली
जालना जिल्ह्यात थंडीचा अलर्ट
हवामान विभागाने जालना जिल्ह्यात थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आज किमान तापमान 11°C अंशापर्यंत खाली घसरल्याने चांगलीच हूडहुडी भरल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत. पुढील दोन दिवसात पारा 9°C पर्यंत घसरण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने जिल्ह्यात यंदा चांगलीच थंडी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली गेले आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमानात 11 अंशांनी घट झाली होती. पुन्हा एकदा जिल्ह्यात थंडीची लाट पसरल्याने जनजीवनावर देखील याचा परिणाम होत असून वाढत्या थंडीच्या बचावासाठी ग्रामीण भागात शेकोटीचा आधार घेतला जात आहे.
नक्की वाचा - बेसावधपणे टॉयलेटमध्ये गेला, आणखी कुणीतरी असल्याचा भास; सीटवर बसणार तोच..., थरकाप उडवणारा Video
भंडारा गोंदिया जिल्ह्याचा पारा 10 अंश सेल्सिअसवर
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा पारा 10 अंश सेल्सिअसवर घसरला आहे. रात्री आणि दिवसा देखील नागरिकांना थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर शेतकरी देखील सूर्याचा पारा कधी चढतो याची वाट पाहूनच आपली कामं सुरू करीत आहेत.
नागपुरात कडक थंडी, पारा 10.5 वर
नागपूरमध्ये कडक थंडी पाहायला मिळतेय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानासोबत दिवसाचं तापमानही सातत्यानं घसरतंय. सोमवारी नागपूरचं किमान तापमान सामान्यपेक्षा 5 अंश खाली म्हणजे 10.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं होतं. नागपूरचं तापमान आणखी 0.78 अंशाने खाली गेल्यास दशकातल्या सर्वात थंड दिवसाची नोंद होईल. विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेची स्थिती कायम राहणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
