Maharashtra Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीतील 4 निर्णयांमुळे मुंबई-ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार

Maharashtra Cabinet Decision: ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक 12 हजार 220 कोटी 10 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तब्बल 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई आणि ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने चार निर्णय घेण्यात आले आहेत, ज्याचा फायदा मुंबईकर आणि ठाणेकरांना होणार आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग, रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या एसआरए या प्रकल्पांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. 

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यतेचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा प्रकल्प 9 हजार 158 कोटी रुपयांचा असून, राज्य शासनाच्या करासाठी 614 कोटी 44 लाख रुपये, केंद्राच्या कराच्या पन्नास टक्के रकमेसाठी 307 कोटी 22 लाख रुपये, भुसंपादनासाठी 433 कोटी असे एकूण 1 हजार 354 कोटी 66 लाख रुपये बिनव्याजी दुय्यम कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. 

(नक्की वाचा : महायुती सरकार सुसाट! शेतकरी, विद्यार्थी, विकासकामे.... मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 38 निर्णय)

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक 12 हजार 220 कोटी 10 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी 29 किलोमीटर्स असून, 20 उन्नत स्थानके व 2 भूमिगत स्थानके आहेत.

(नक्की वाचा: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय)

ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग 

ठाणे ते बोरीवली या भुयारी मार्गासाठी 18 हजार 800 कोटी 40 लाख रुपयांच्या प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या  या सहा पदरी मार्गाच्या दुहेरी-भुयारी मार्गाचे बांधकाम प्रतिपदरी भुयारी मार्गाची एकूण 11.85 किमी अशी असून, एकूण 18 हजार 838 कोटी 40 लाख अशा किंमतीच्या प्रकल्पाची एमएमआरडीए मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली. 

Advertisement

(नक्की वाचा: EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार)

रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या एसआरएला गती देणार

रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यासाठी एमएमआरडीएला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कुर्ला येथील 14 हेक्टर जमिनीची रेडिरेकनरनुसार 25 टक्के जमीन अधिमूल्याची रक्कम सुरवातीला न घेता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विक्री करून मिळणाऱ्या रकमेतून हे अधिमूल्य भरण्याची सवलत एमएमआरडीएला देण्यात येईल.

Advertisement