MHADA Lottery : मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी दिवाळीत लॉटरी

मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. मुंबईतील ही घरे कुठे असणार आहेत, या घरांच्या किमती काय असतील? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

MHADA Lottery News : मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. येत्या दिवाळीत म्हाडाअंतर्गत नव्या घरांसाठी लॉटरी निघणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हाडाच्या विविध प्रकल्प, भविष्याताली नियोजन आणि बीडीडी पुर्नविकास प्रकल्पाबद्दल संजीव जयस्वाल यांनी माहिती दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. मुंबईतील ही घरे कुठे असणार आहेत, या घरांच्या किमती काय असतील? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांच्या चावीचे वाटप देखील मे महिन्यात केलं जाणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा - MHADA : म्हाडाच्या घरांच्या किमतीचा वाद उच्च न्यायालयात, ग्राहकांची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?)

संजीव जयस्वाल यांनी सांगितलं की,  मुख्यमंत्री वॉर रुमच्या धर्तीवर आम्ही प्रोजेक्ट मॉनिटरिंग देखील करणार आहोत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे देखील म्हाडा प्रशासन आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करु.  म्हाडा कार्यालयात ऑफिस नेव्हिगेटर लावलेले आहेत, ज्याद्वारे कोणतं ऑफीस कुठे आहे? हे लक्षात येईल आणि त्याचा फायदा नागरिकांना होईल. 

(नक्की वाचा-  Best Bus fare : मुंबईतील प्रवास महागणार, बेस्ट बसच्या भाडेवाढीला BMC ची मंजुरी)

मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, जीटीबी नगर, पत्राचाळ पुनर्विकास करणे असे काही निर्णय झाले आहेत. बीडीडी पुर्नविकास प्रकल्पातील काही घरं तयार आहेत. तांत्रिक अडचण आली होती,  मात्र यासंदर्भात प्रश्न सुटला आहे. पुढील आठवड्यात ओसी देखील मिळेल, लॉटरी देखील झाली आहे. 15 मे पर्यंत चावी वाटपासंदर्भात आपण कार्यक्रम करणार आहोत. नायगाव, एनएम जोशी आणि वरळी बीडीडीची कामे देखील जलदगतीने सुरु आहेत, अशीही माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article