जाहिरात

Mumbai water shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, धरणांमध्ये केवळ इतकाच साठा शिल्लक

मुंबईतील धरणांमध्ये केवळ 39 टक्के साठा शिल्लक असल्याने मुंबईकरांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरं जाण्याची शक्यता आहे. 

Mumbai water shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, धरणांमध्ये केवळ इतकाच साठा शिल्लक

Mumbai water shortage : आता कुठे उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यातच नागरिक वाढत्या उकाड्याने त्रस्त झाले आहे. पुढचे तीन महिने तरी नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 39 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्रात पावसाळा येईपर्यंत जून महिना उजाडतो. त्यात मुंबईतील धरणांमध्ये केवळ 39 टक्के साठा शिल्लक असल्याने मुंबईकरांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरं जाण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात केवळ 39 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जुलैपर्यंत हा पाणी पुरवठा पुरेल की नाही हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती करण्यात आली आहे. धरणं भरण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता असते.

Pune News : पुण्यातील 'हॉटेल वैशाली'च्या वादात मोठी कारवाई, जावयाला अटक,  काय आहे प्रकरण?

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील 'हॉटेल वैशाली'च्या वादात मोठी कारवाई, जावयाला अटक, काय आहे प्रकरण?

मात्र मुंबईत तसा पाऊस येण्यासाठी जुलैपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे पुढील तीन महिन्यांहून जास्त काळ 39 टक्के पाणीसाठा पुरवावा लागेल. मुंबई वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा विहार आणि तुळशी अशी सात धरणं आहे. मात्र यात पुरेसा पाणीसाठी उपलब्ध नाही. गेल्या वर्षीय जुलनेत पाणीसाठा जास्त असला तरी पाणी कपात टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे धरणातील राखीव पाणीसाठ्याची मागणी केल्याचं अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: