Nagpur News : MBA, इंजिनियरिंग आणि कायद्याचे पदवीधारक आणि पदव्युत्तर त्याशिवाय व्यावसायिक शिक्षण घेतलेले तरुण नागपुरातील रस्त्यावर कचरा काढताना दिसणार आहेत. नागपूर पालिकेच्या चतृर्थ श्रेणी सफाई कर्मचार्यांच्या नोकरीसाठी शिक्षित तरुणांनी अर्ज केला होता. सरकारी नोकरीसाठी या तरुणांनी सफाई कामगार होण्याची तयारी दर्शवली आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून नियुक्ती पत्र..
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुर पालिकेतील नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आलं. यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते. एकूण भरतींपैकी ४७६ स्वच्छता कर्मचारी आहेत तर १०३ उमेदवारांना पालिकेच्या थेट प्रक्रियेतून टॅक्स कलेक्टर, क्लर्क आणि ग्रंथपालासारख्या वेगवेगळ्या पदांवर नियुक्त करण्यात आलं आहे.
४७६ तरुणांची थेट भरती...
सफाई कर्मचाऱ्यांमध्ये लाड पेज कमिटीच्या शिफारसीअंतर्गत १२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी सफाई कर्मचारी श्रेणीत ३४७ जणांना भरती करण्यात आलं. ४७६ भरती झालेल्या उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक पदवीधर आहेत. तर अनेकांकडे पदव्युत्तर पदवीही आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काहींजवळ MBA, बॅचलर ऑफ इंजिनियरिंग आणि एलएलबीसारखी प्रोफेशनल डिग्रीदेखील आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world