जाहिरात

Hit And Run Case : मद्यधुंद कारचालकाने माय-लेकाला चिरडले, दोघांचाही दुर्दैवी अंत; हृदयद्रावक घटना

Nandurbar Crime : शहादा शहरातील शतपावली करणाऱ्या आई व मुलाला एका भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

Hit And Run Case : मद्यधुंद कारचालकाने माय-लेकाला चिरडले, दोघांचाही दुर्दैवी अंत; हृदयद्रावक घटना

Hit And Run Case:  शहादा शहरातील (Nandurbar Shahada) डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई व मुलाला भरधाव चार चाकी वाहनाने मागून धडक दिल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या श्वानाचाही या अपघातात मृत्यू झाला असून घटनास्थळावरून वाहन चालक फरार झाला आहे. हिट अँड रन ची घटना घडली असून मद्यधुंद वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार,  रात्री 10.30 वाजेच्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरील संजय पावभाजी समोर कल्पना गजानन वाघ (45 ) व मुलगा आकाश गजानन वाघ (19) व भाविक वसईकर राहणार द्वारकाधीश नगर शहादा व त्यांच्यासोबत असलेला पाळलेला श्वान हे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी शतपावली करीत असताना पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर कार (क्रमांक MH15 JA 5055) वरील मद्यधुंद चालकाने  भरधाव वेगाने वाहन चालवून  कल्पना वाघ, आकाश वाघ, भाविक वसईकर व श्वान यांना मागून जोरदार धडक दिली.

Nagpur Crime: मोठा गुंड कोण? म्हणत राडा; तुरुंतागून सुटलेल्या कुख्यात भाईला संपवलं, शहरात खळबळ

नक्की वाचा - Nagpur Crime: मोठा गुंड कोण? म्हणत राडा; तुरुंतागून सुटलेल्या कुख्यात भाईला संपवलं, शहरात खळबळ

अपघात एवढा भीषण होता की, कल्पना वाघ या महिलेला कारने  काही अंतर अक्षरशः फरफडत नेले. यात  महिलेचा व श्वानाचा जागीच मृत्यू झाला तर आकाश गंभीरित्या जखमी झाला तसेच भाविकही दुखापती झाला.  अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला वरील जखमींना हॉस्पिटल ला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

यात कल्पना वाघ या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषित केले तर आकाश याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारार्थ धुळे येथे नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला तर भाविक वसईकर हा जखमी झाला आहे. यासंदर्भात शहादा पोलीस स्टेशनला फॉर्च्यूनर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: