
निलेश वाघ, मनमाड
Nashik Accident : नाशिकच्या येवला तालुक्यातील ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आला आहे. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. धामणगाव-भारम रस्त्यावर हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद विश्वनाथ कांबळे व उषा विनोद कांबळे हे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलस्वार विनोद कांबळे व उषा कांबळे हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. काही वेळातच विनोद काळे यांचा मृत्यू झाला.
अपघात इतका तीव्र होता.दुचाकीस्वार कांबळे यांचा उजवा हात अक्षरश: खांद्यापासून वेगळा झाला. तर ऑल्टो चालक सिकंदर दलिल शेख हा देखील जखमी झाला आहे.जखमींना उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.अपघातास दोषी असलेल्या कार चालकाला शिक्षा करावी अशी मागणी कांबळेंच्या नातेवाईकांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world