जाहिरात

Ashok Kharat Case: 20-50 रुपयात विकले जात होते व्हिडीओ! अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Nashik Ashok Kharat Case: अशोक खरातवर लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे एकूण १२ गुन्हे दाखल असून, त्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Case: 20-50 रुपयात विकले जात होते व्हिडीओ! अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पहिली पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ED) करणार आहे.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे आणि गुन्हे

नाशिक आणि अहिल्यानगर मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास 24 सदस्यांची SIT करत आहे. एकूण 12 पैकी 8 गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असून उर्वरित फसवणुकीचे आहेत. चिंचोके आणि दगड देऊन चमत्कार करण्याचा दावा खरात करायचा. दैवी शक्ती असल्याचे भासवून तो महिलांना घाबरवून त्यांचे शोषण करत असे.

(नक्की वाचा- Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं)

अश्लील व्हिडिओंची विक्री आणि सायबर गुन्हे

या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे पीडित महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपीचे 15 ते 17 अश्लील व्हिडिओ पॉर्न साईट्स, फेसबुक आणि टेलिग्रामवर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहण्यासाठी 20 ते 50 रुपये प्रति व्हिडिओ असे दर आकारले जात होते.  पीडितांची ओळख उघड करणाऱ्या चार सोशल मीडिया लिंक्सविरोधात आयटी ॲक्टच्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(नक्की वाचा- Iran-US War: पायलटला वाचवण्यासाठी महाभारतातील रणनीती आली कामी; शत्रूच्या घरात घुसून अमेरिकेचा 'माईंड गेम')

ईडीची एन्ट्री आणि आर्थिक चौकशी

अशोक खरातने भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन मोठी माया जमवल्याचा संशय आहे.  ईडीने या प्रकरणाची दखल घेतली असून SIT कडून सर्व आवश्यक कागदपत्रे मागवून घेतली आहेत. खरातच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची चौकशी आता केंद्रीय यंत्रणा करणार आहे. आरोपीच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डची शासन स्तरावर सखोल तपासणी सुरू आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com