जाहिरात

Nashik Crime : पुस्तके पडली म्हणून हैवानाची मुलाला अमानुष मारहाण, दुकानदार रहिमन अन्सारीला अटक

Nashik Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबरच्या दिवशी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगा यशराज वही घेण्यासाठी पवानानगर येथील लकी गिफ्ट स्टोअर येथे गेला होता.

Nashik Crime : पुस्तके पडली म्हणून हैवानाची मुलाला अमानुष मारहाण, दुकानदार रहिमन अन्सारीला अटक

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

किरकोळ कारणावरुन दुकानदाराने 8 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी दुकानादारासह त्याच्या साथीदारांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यशराज पाटील असं मारहाण झालेल्या मुलाचं नाव आहेत. तर जमादार रहिमन अन्सारी, बशीर जमादार अन्सारी आणि इतर दोन जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबरच्या दिवशी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगा यशराज वही घेण्यासाठी पवानानगर येथील लकी गिफ्ट स्टोअर येथे गेला होता.

त्यावेळी दुकानात यशराजकडून नकळत काउंटरवरील पुस्तके खाली पडली. यामुळे संतापलेल्या दुकान मालक जमादार अन्सारी याने यशराजला  चपला, बुटाने पाठीवर व डोक्यावर मारहाण केली आहे. मुलगा रडत रडत घरी गेला. मुलाला किती मारहाण झाली याचा अंदाज त्याच्या अंगावर उठलेल्या वळांमुळे लावता येऊ शकतो.

(नक्की वाचा-  Pune Crime News : कल्याणनंतर पुणे हादरलं! अत्याचाराचा प्रयत्न फसला, दोन सख्ख्या बहिणींची हत्या

Nashik News

Nashik News

मुलाचे वडील अभिजीत पाटील यांनी  मारहाण केल्याबाबत दुकानदाराला जाब विचारला. मात्र चूक कबुल करण्याऐवजी दुकानदाराने उलट अविनाश यांनाच शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.  दुकानाजवळ उभ्या असलेल्या आणखी तिघांनी देखील शिवीगाळ करुन मारण्यास सुरुवात केली. मात्र आजूबाजूचे लोक जमा झाल्याने आरोपींनी मारहाण करणे थांबवलं. 'पुन्हा इथे आलास तर कापून फेकून देऊ', अशी धमकी देखील आरोपींनी दिल्याचं अभिजीत यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा-  Youtuber रणवीर अलाहाबादिया थोडक्यात बचावला; समुद्रात बुडताना IPS-IRS अधिकारी दाम्पत्याने वाचवला जीव)

यानंतर अभिजीत यांनी अंबड पोलीस ठाण्यात जात दुकान मालकासह त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com