जाहिरात

Nashik Crime: 'हनीट्रॅप'मध्ये अडकवून ब्लॅकमेल; नाशिकच्या तरुणाला 53 लाखांचा गंडा

Nashik News: नाशिकच्या पंचवटीतील एका व्यावसायिकाला तरुणीने फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५३ लाख रुपये उकळले.

Nashik Crime: 'हनीट्रॅप'मध्ये अडकवून ब्लॅकमेल; नाशिकच्या तरुणाला 53 लाखांचा गंडा

राहुल वाघ, नाशिक

नाशिकमधील पंचवटी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल 53 लाख रुपयांना गंडा घातला आहे. फसवणुकीनंतर या तरुणीने तरुणाला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

अशा प्रकारे घातला गंडा

संबंधित तरुणीने फेसबुक प्रोफाइल आणि वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून पंचवटीतील तरुणाशी संपर्क साधला. संभाषणातून तिने तरुणाचा विश्वास संपादन करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मैत्रीचे रूपांतर झाल्यावर तिने 'क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग'मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. तिने दिलेल्या युनिटी स्मॉल फायनान्सच्या खात्यांवर आणि विविध UPI आयडीवर तरुणाने 53 लाख रुपये पाठवले. गुंतवणुकीनंतर एका बनावट प्लॅटफॉर्मवर ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या स्वरूपात वाढल्याचे तरुणाला भासवण्यात आले.

(नक्की वाचा-  Iran War Crises: सिलेंडरच्या किंमती 3000 रुपयांवर! मुंबईतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर)

पैसे काढताना सुरू झाले ब्लॅकमेलिंग

जेव्हा तरुणाने आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तरुणीने पुन्हा 34 लाख रुपये भरण्याची मागणी केली. तरुणाने याला नकार देताच तरुणीने आपले खरे रूप दाखवले. तरुणीने अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 53 लाख रुपये हडप केल्यानंतर, तिने तरुणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिली.

सायबर पोलिसांकडून तपास सुरू

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात हॅकर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. संशयित तरुणीने वापरलेले बँक खाते आणि व्हॉट्सॲप नंबर पोलिसांच्या रडारवर आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com