नवऱ्याने प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो दाखवले, सासू-नणंदेकडून भयानक छळ; नाशकात नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचललं

Nashik Suicide Case: 6 जून 2025 मध्ये लग्न झालेल्या नेहाने चिठ्ठीमध्ये सासरच्या मंडळींवर केलेले आरोप मन सुन्न करणारे आहेत. नेहाने चिठ्ठीत लिहिलं की, 'सुपारी' वेळी सांगितल्याप्रमाणे माहेरच्यांनी 15 लाख रुपये खर्च करून 2 हजार लोकांमध्ये लग्न लावले.

जाहिरात
Read Time: 3 mins

Nashik News: वैष्णवी हागवणे आणि डॉ. गौरी गर्जे यांच्या कौंटुबिक छळांच्या घटनेनंतर नाशिक देखील अशाच एका घटनेने हादरले आहे. नाशिकमध्ये एका नवविवाहितेच्या आत्महत्येमुळे सासरच्या जाचाचा आणि हुंडाबळीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटी येथील हिरावाडी परिसरात राहणाऱ्या नेहा संतोष पवार या नवविवाहितेने बुधवारी दुपारी विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले. मरण्यापूर्वी तिने 7 पानी सुसाईड नोट लिहून सासरच्या लोकांवर आणि पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

नेहाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सात पानी चिठ्ठी हा या प्रकरणाचा पुरावा आहे. सासरचे लोक चिठ्ठी गायब करतील या भीतीने तिने चिठ्ठीचे फोटो काढून ते व्हॉट्सॲपद्वारे भावाला पाठवले होते. यामुळे सासरच्या लोकांचा क्रूरपणा उघडकीस आला. सात पानांची चिठ्ठी लिहून नेहाने आपल्याला झालेला त्रास सर्वांसमोर मांडला. पंचवटी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

सुसाईड नोटमधील महत्त्वाचे मुद्दे आणि आरोप

6 जून 2025 मध्ये लग्न झालेल्या नेहाने चिठ्ठीमध्ये सासरच्या मंडळींवर केलेले आरोप मन सुन्न करणारे आहेत. नेहाने चिठ्ठीत लिहिलं की, 'सुपारी' वेळी सांगितल्याप्रमाणे माहेरच्यांनी 15 लाख रुपये खर्च करून 2 हजार लोकांमध्ये लग्न लावले. हुंडा प्रथा बंद असतानाही सोने हुंडा म्हणून द्यावे लागले.

(नक्की वाचा-  Pune Police: पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुण्याला मिळणार 5 नवीन पोलीस स्टेशन अन् 2 नवे डीसीपी)

नवऱ्याचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध

लग्नापूर्वी नवऱ्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. एवढेच नाही तर नवऱ्याने तिला त्या मुलीचे अश्लील फोटोही दाखवले होते. नेहाच्या म्हणण्यानुसार, सासरच्या लोकांनी तिची फसवणूक केली. सासरचे लोक सतत माहेरून पैसे घेऊन ये म्हणायचे. त्यांच्या मागणीनुसार नेहाने 20 हजार रुपये आणि भावाची गाडी नवऱ्याला आणून दिली होती.

Advertisement

चरित्रावर संशय

नवरा सारखा 'तुझा कोणी ठेवलेला यार असेल' म्हणून सारखी माहेरी जाते असे टोमणे मारायचा. पाळी आली आहे असे सांगितल्यावर सासूने संशय घेतला आणि नणंदेने पॅड लावून तपासले होते. नवऱ्याने बनियानही दिले होते. नवरा रात्री लवकर झोपू देत नाही, आईवरून शिवीगाळ करतो आणि दोन वेळा मारहाणही केली. आजारी असतानाही काम करून घ्यायचे. नणंदा टोमणे मारायच्या आणि नवऱ्याला व सासूला खोटे सांगायच्या, असं गंभीर आरोप नेहाने आपल्या सुसाईड नोटमध्ये केले आहेत.

(नक्की वाचा- Shocking News: नवरा-बायको घरात आढळले मृतावस्थेत; भिंतींवर एक नाव, मोबाईल नंबर अन् मुलांसाठी खास मेसेज)

नेहाने आपल्या चिठ्ठीच्या शेवटी अत्यंत भावनिक होत लिहिलं की, "तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलं पण माझं नशीब खराब होते, म्हणून नवरा आणि सासर चांगले भेटले नाही. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष पिऊन स्वत:ला संपवते आहे."

Advertisement

Topics mentioned in this article