रेवती हिंगवे, पुणे
Pune News:
हाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर गेल्या काही वर्षांत अत्यंत जलद गतीने विकसित होत आहे. शहरातील नागरिकांची वाढती संख्या, विस्तारणारे क्षेत्र आणि सोबतच वाढती गुन्हेगारी या सर्व गोष्टींचा विचार करून पुणे पोलीस प्रशासनाने आपली क्षमता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, पुणे पोलीस दलात मोठे बदल लवकरच अमलात येणार आहेत.
दोन नवीन पोलीस उपायुक्त (DCP)
पुणे शहराच्या वाढत्या व्याप्तीमुळे आणि गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी दोन नवीन पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी पुणे पोलीस दलाला मिळणार आहेत. यामध्ये झोन 6 आणि झोन 7 असे दोन नवीन पोलीस उपायुक्त झोन तयार केले जाणार आहेत. यामुळे प्रशासकीय स्तरावर जबाबदारीचे अधिक चांगले विकेंद्रीकरण शक्य होईल.
(नक्की वाचा- Shocking News: नवरा-बायको घरात आढळले मृतावस्थेत; भिंतींवर एक नाव, मोबाईल नंबर अन् मुलांसाठी खास मेसेज)
पाच नवीन पोलीस स्टेशन
वाढत्या लोकसंख्येला योग्य पोलीस सेवा पुरवण्यासाठी शहरात पाच नवीन पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन पोलीस स्टेशनमुळे आता पुणे शहरात एकूण 45 पोलीस स्टेशनची संख्या होणार आहे.
कुठे असतील नवीन पोलीस स्टेशन
- नर्हे
- लक्ष्मीनगर
- येवलेवाडी
- मांजरी
- लोहगाव
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
या नवीन पोलीस स्टेशनच्या स्थापनेमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस स्टेशनवरील कामाचा ताण कमी होईल आणि नागरिकांना त्यांच्या परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळचे पोलीस स्टेशन उपलब्ध होईल. याबाबतचा शासन आदेश लवकरच जाहीर होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world