Nashik Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का, मुलावर मोक्का अंतर्गत कारवाई

Nashik News : दीपक बडगुजर यांच्यासह टोळीवर मोक्काची कारवाई झाल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिममधून ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

विधानसभा निवडणुकीची एकीकडे धामधूम सुरु झाली आहे. निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्याने सर्वच नेत्यांना तयारी सुरु केली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे.  सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर आरोपी आहेत. दीपक बडगुजर यांच्यासह टोळीवर मोक्काची कारवाई झाल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिममधून ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत. मात्र मुलावरील कारवाई त्यांच्यासाठी मोठा मानला जात आहे. 

Advertisement


Topics mentioned in this article