जाहिरात

Navi Mumbai: नवी मुंबईची आता नवीन शैक्षणिक ओळख! सिडकोची आंतरराष्ट्रीय एज्युसिटी गेमचेंजर ठरणार

त्यानुसार कुंडेवहाळ येथे सुमारे 100 हेक्टरवर एज्युसिटी विकसित करण्यात येत असून ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3-4 किमीच्या परिघात वसलेली आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईची आता नवीन शैक्षणिक ओळख! सिडकोची आंतरराष्ट्रीय एज्युसिटी गेमचेंजर ठरणार
नवी मुंबई:

राहुल कांबळे

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्र म्हणजेच सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत, अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. एकात्मिक आरोग्यविषयक व शैक्षणिक सुविधा, आंतरराष्ट्रीय मानकांचे क्रीडा संकुल व कौशल्य केंद्र उभारण्याच्या प्रमुख उद्देशाने, उत्कृष्टता केंद्र हा प्रकल्प सिडकोतर्फे विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे नवी मुंबई हे नजीकच्या काळात जागतिक शिक्षण केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या प्रकल्पाकरिता जमीन विकसित करण्याच्या कामाला गती देण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. 

आंतरराष्ट्रीय एज्युसिटी हा देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारा प्रकल्प असून याद्वारे देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी विद्यापीठे व नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ज्ञानी समाजाची निर्मिती, बहुसांस्कृतिक आदानप्रदान आणि संशोधन यांना चालना मिळणार आहे. नियोजित वेळेत एज्युसिटी प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर आहे असं सिकडोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय एज्युसिटी एक ऐतिहासिक उपक्रम असून ज्यामध्ये एकाच ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये दहा हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सामील असतील. हा देशातील अशा प्रकारचा एकमेव उपक्रम ठरेल असं ही त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Shocking News: सुंदर मॉडेल, लिव्ह इन अन् लव्ह जिहाद!, प्रेग्नंसी आधी 'हेझिटेशन कट', हादरवून टाकणारं प्रकरण

14 जून 2025 रोजी सिडको, महाराष्ट्र शासन आणि यॉर्क विद्यापीठ, ॲबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयईडी विद्यापीठ या पाच नामांकित परदेशी विद्यापीठांदरम्यान सामंजस्य करारनामा करण्यात आला. नवी मुंबईमध्ये कॅम्पस स्थापन करण्याकरिता या विद्यापीठांना इरादापत्रे प्रदान करण्यात आली.  महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोच्या एज्युसिटी उपक्रमांतर्गत नवी मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस स्थापन करण्यात येणार आहेत. 

नक्की वाचा - Trending News: IAS असलेल्या पत्नीने IAS नवऱ्या विरोधात दाखल केला गंभीर गुन्हा, कारण ऐकून हादरून जाल

त्यानुसार कुंडेवहाळ येथे सुमारे 100 हेक्टरवर एज्युसिटी विकसित करण्यात येत असून ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3-4 किमीच्या परिघात वसलेली आहे. या व्यतिरिक्त मल्टिमोडल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांद्वारे देखील कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. मुंबईहून वाहनाद्वारे एज्युसिटी एक तासाच्या अंतरावर असून एरोसिटी, नैना शहर, खारघर कार्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स  व पनवेल महानगरपालिका क्षेत्रापासूनही नजीकच्या अंतरावर आहे. एज्युसिटीकरिता देण्यात आलेली जमीनीच्या सपाटीकरणाचे काम आवश्यक असून जमिनींचे सुलभरीत्या वाटप करता यावे म्हणून चार स्वतंत्र भूखंडांवर भूविकासाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोतर्फे भाग-1 व भाग-2 मधील 50 हेक्टर जमिनीच्या विकासासह 45 मी. x30 मी. रुंद प्रवेश मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. 

नक्की वाचा - Shocking: सर्वाधिक आळशी लोक राहणारे जगातील देश कोणते? टॉप 10 यादीत भारताचा क्रमांक कितवा?

तर ई-निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर 45 मी. रुंद मार्गाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 348 (राष्ट्रीय महामार्ग 4बी) जेएनपीटी वरून एज्युसिटी येथे थेट प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पनवेल रेल्वे स्थानक जोडणारी मेट्रो लाईन एम-२४ ची योजना आखत आहे, जी नैना क्षेत्रापर्यंत विस्तारेल आणि प्रस्तावित एरोसिटी आणि एज्युसिटीला देखील जोडेल.नवी मुंबईला जागतिक शिक्षण केंद्र बनवण्याकरिता सिडकोची कटिबद्धता अधोरेखित करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या भूविकासाची कामे व ई-निविदा प्रक्रिया यांना सुरुवात झाली असून देशाच्या शिक्षण क्षेत्रातील हा क्रांतिकारी प्रकल्प ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com