जाहिरात

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये ट्रॅफिक पोलिसांचे ‘रेट कार्ड’ चर्चेत? पोलीस मस्त, प्रवासी त्रस्त

Navi Mumbai News : नवी मुंबईतील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नामागे वाहतूक पोलिसांचे 'रेट कार्ड' कार्यरत असल्याची गंभीर चर्चा आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये ट्रॅफिक पोलिसांचे ‘रेट कार्ड’ चर्चेत? पोलीस मस्त, प्रवासी त्रस्त
Navi Mumbai Traffic : सीबीडी बेलापूर कोकण भवन (Kokna Bhavan) परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते.
नवी मुंबई:

Navi Mumbai Traffic : नवी मुंबईकरांना वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा अनुभव रोज सहन करावा लागत आहे. बेलापूर, सीबीडी (CBD) आणि कोर्ट रोड (Court Road) परिसरात दररोज होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) आता केवळ गैरसोयीचा नव्हे, तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी समस्या बनली आहे. या गोंधळलेल्या परिस्थितीमागे वाहतूक पोलिसांचे 'रेट कार्ड' कार्यरत असल्याची गंभीर चर्चा आहे. ओव्हरलोड डम्पर (Overloaded Dumpers), बेकायदा प्रवासी वाहतूक (Illegal Passenger Transport) आणि बनावट पोलिसांकडून (Fake Police) होणारी वसुली यामुळे नवी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.

वाहतूक नियमांना धाब्यावर बसवणारे ओव्हरलोड डम्पर आणि टँकर

नवी मुंबईच्या मुख्य रस्त्यांवर ओव्हरलोड (Overload) डम्पर आणि टँकरची बेफाम धाव सुरू आहे. हे डम्पर परवानगीपेक्षा कितीतरी पट जास्त मुरूम, वाळू किंवा सिमेंट घेऊन धावत असल्याचे स्पष्टपणे दिसते. धक्कादायक बाब म्हणजे, काही वाहनांकडे पीयूसी (PUC), फिटनेस (Fitness), इन्शुरन्स (Insurance) यांसारखी आवश्यक कागदपत्रेही नाहीत, तरीही त्यांना शहरात विनाअडथळा प्रवेश मिळतो. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये 15 वर्षांपेक्षा जुन्या डम्परचाही समावेश आहे, ज्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. पाण्याचे टँकर आणि सिमेंट ट्रकही याच पद्धतीने नियमांना पायदळी तुडवत असल्याने शहरातील अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढला आहे.

बेकायदा प्रवासी वाहतूक: 'व्हाईट नंबर'चा गैरवापर आणि फिक्स वसुली

नियमांनुसार खासगी वापरासाठी असलेल्या 'व्हाईट नंबर'च्या (White Number) वाहनांमधून सायन-कल्याण (Sion-Kalyan), बेलापूर, पनवेल (Panvel), तुर्भे (Turbhe) या मार्गांवर बेकायदा प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे चालक परवानगीपेक्षा दुप्पट प्रवासी भरून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत.

( नक्की वाचा : Navi Mumbai: 50 रुपये द्या आणि रस्त्यावर वाहन लावा! नवी मुंबईत 'मांडवली'चा नवा पॅटर्न,वाचा काय आहे प्रकार? )
 

या वाहनांमध्ये कॅमेरे (Cameras) नाहीत, फायर सेफ्टी (Fire Safety) नाही, महिला वाहक (Lady Conductor) नाही आणि आरटीओची (RTO) एकही अट पूर्ण केली जात नाही. तरीही, या बेकायदा वाहतुकीसाठी "प्रत्येक वाहनामागे महिना 2,000 रुपये घेतले जातात" अशी स्थानिकांची तक्रार आहे.

 "महिना 2,000 रुपये दिले की कुणीही पकडत नाही." असा दावा डम्पर चालकानं केलाय.  या फिक्स वसुलीमागे कोणाचे पाठबळ आहे, याबद्दल नागरिक आता थेट प्रश्न विचारू लागले आहेत.

बनावट पोलिसांकडून वसुली 

नानू घरे (Nanu Ghare) परिसरात काही व्यक्ती पोलीस (Police) असल्याचे भासवून वाहनधारकांकडून पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा बनावट पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी काही अधिकृत पोलिसांकडूनच 'डोळेझाक आणि वसुली' (Negligence and Extortion) होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

याव्यतिरिक्त, नवी मुंबईतून मुंबई-पुणे (Mumbai-Pune) मार्गावर आर्टिगा (Ertiga) कारद्वारे मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी वाहतूक केली जाते. या गाड्या थेट एसटी (ST) थांब्यावर उभ्या राहून प्रवाशांवर दादागिरी करतात, नियमित टॅक्सी आणि बस व्यवसायाचे नुकसान करतात आणि शासनाचा मोठा महसूल बुडवतात. यामुळेच, "पोलीस मस्त, प्रवाशी त्रस्त!" अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

Latest and Breaking News on NDTV

बेलापूर, सीबीडीमध्ये वाहतूक कोंडीचा कहर

सीबीडी बेलापूर कोकण भवन (Kokna Bhavan) परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. याचे मुख्य कारण म्हणजे ओव्हरलोड डम्पर, बेकायदा व्हाईट नंबर वाहने, अनियमित पार्किंग (Irregular Parking) आणि तुर्भे, तळोजा (Taloja), वाशी (Vashi), कोपर खैराणे (Koper Khairane) भागातील ट्रॅफिक पोलिसांचा (Traffic Police) अभाव. शाळा-कॉलेजच्या (School-College) वेळेत रिक्षा, बस आणि खाजगी वाहनांच्या गर्दीमुळे ही समस्या आणखी गंभीर होते.

नागरिकांची प्रशासनाकडे 5 महत्त्वाच्या मागण्या

नवी मुंबईकरांनी प्रशासनासमोर तातडीने पुढील 5 मागण्या ठेवल्या आहेत:

ओव्हरलोड वाहनांवर तात्काळ विशेष मोहीम राबवावी.

व्हाईट नंबरवरील बेकायदा प्रवासी वाहतूक त्वरित बंद करावी.

बनावट पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.

15 वर्षांपेक्षा जुने आणि कागदपत्र नसलेले डम्पर ताब्यात घ्यावेत.

बेलापूर व मुख्य चौकांमध्ये विशेष ट्रॅफिक स्क्वॉडची नियुक्ती करावी.

या बेकायदा वाहनांना कोणाचा आशीर्वाद मिळत आहे? आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे (Milind Bharambe) या गंभीर प्रश्नावर काय ठोस कारवाई करणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

वाहतुकीचा हा प्रश्न केवळ कोंडीचा नसून जनजीवन आणि सुरक्षिततेचा आहे. त्यामुळे आयुक्त काय निर्णय घेतात आणि कितपत कडक पाऊले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com