जाहिरात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाची प्रकृती गंभीर

Sameer Khan : रुग्णालयातून नियमित चेकअपनंतर घरी परतत असताना समीर खान यांचा अपघात झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाची प्रकृती गंभीर
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात समीर खान यांचा कुर्ल्यात कार अपघात झाला होता. रुग्णालयातून नियमित चेकअपनंतर घरी परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक कोण आहेत? बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा करणार तपास!

नक्की वाचा - एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक कोण आहेत? बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा करणार तपास!

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी समीर खान यांच्या पत्नी निलोफर त्यांच्यासोबत होत्या. ते दोघेही नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. चेकअप झाल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर आले. त्यांनी चालकाला गाडी आणायला सांगितलं. तेव्हा चालकाने गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबला. यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांना मल्टिफॅक्टर झालं होतं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: