जाहिरात

Ashok Kharat Case: भोंदू खरात, आर्थिक व्यवहार, जादूटोणा आणि अजित पवारांचा अपघात; रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ

Ashok Kharat Case: आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. भोंदू अशोक खरात याचे आर्थिक व्यवहार, जादूटोणा आणि विमान प्रवासाचा संदर्भ देत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी पवारांनी केली आहे. सविस्तर वाचा.

Ashok Kharat Case: भोंदू खरात, आर्थिक व्यवहार, जादूटोणा आणि अजित पवारांचा अपघात; रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ
"Ashok Kharat Case: अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांची नवी पोस्ट"
IANS English

Ashok Kharat Case: माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत या अपघाताचा संबंध भोंदू अशोक खरात आणि त्याच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी जोडला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सीआयडीने (CID) करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

(नक्की वाचा: Raigad News: महाड हादरलं! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, पालकांमध्ये प्रचंड संताप)

रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय?

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या माहितीचा हवाला देत म्हटलंय की,"अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा." 

(नक्की वाचा: Ashok Kharat Case: नाशिकची बडी महिला अधिकारीही कॅप्टन खरातच्या जाळ्यात? SIT तपासात खळबळजनक कनेक्शन समोर)

रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट

जादूटोणा आणि विमानातून प्रवास

रोहित पवार यांनी केवळ आर्थिक व्यवहारांवरच बोट ठेवले नाही, तर इतरही काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत - 

  • काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या घराबाहेर जादूटोणा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्याचा संदर्भ पवार यांनी दिला.
  • भोंदू खरात याने VSR कंपनीच्या विमानांमधून अनेकदा प्रवास केल्याचा दावा करत, त्याला कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
  • खरातचे अनुयायी आणि त्याची एकूण हालचाल ही घातपाताचा संशय अधिक गडद करणारी असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com