राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडत आहेत. जितेंद्र आव्हाड सातत्याने अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांना धारेवर धरत आहेत. आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांचा गद्दार असा उल्लेख केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्रा येथे रात्री उशीरा एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या गद्दारांवर तुम्ही पाठिंबा द्याल का? भाजपला आणि त्यांच्यासोबत असलेल्या अजित पवारांची साथ द्याल का? अजित पवार सर्वात मोठे गद्दार आहेत, जे काकांच्या मरण्याची वाट पाहत आहेत.
(नक्की वाचा - 'मुख्यमंत्र्याचा गणपती करून समुद्रात उचलून टाकू', बच्चू कडू यांचा इशारा)
ज्या मुलाला हात पकडून मोठं केलं, जर तोच घराबाहेर काढत असेल तर ही किती दु:खाची गोष्ट आहे. हे सर्व गद्दार त्यांचेच चेले आहेत, जे गद्दारांचे बादशाह आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे ,कळवा ,मुंब्रा या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांच्या कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांनी आगळावेगळा केक कापत आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या. 'आपकी बार चौथी बार फिक्स' आमदार अशा आशयाचा केक कापून येणाऱ्या निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याच्या शुभेच्छा कार्यकर्त्यांनी दिल्या.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी नगरसेवकांनी जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. मात्र आव्हाड यांच्या मतदारसंघात वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विविध समाज उपयोगी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यात शुभेच्छा देणारे बॅनर, केकच्या माध्यमातून सत्ताधारी म्हणजेच अजित पवार यांना एक प्रकारचा इशारा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world