जाहिरात

नागपूरमध्ये सिमेंटचे ब्लॉक्स बनवणाऱ्या फॅक्टरीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू तर 9 जखमी

Nagpur Blast : बॉयलरच्या कॅप्सुलमध्ये ब्लास्ट झाल्याने एका मजुराचा मृत्यू तर अन्य 9 मजूर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूरमध्ये सिमेंटचे ब्लॉक्स बनवणाऱ्या फॅक्टरीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू तर 9 जखमी

संजय तिवारी, नागपूर

नागपूरच्या मौदा येथे सिमेंट काँक्रिटचे ब्लॉक्स बनवणाऱ्या फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.  झुरली येथील श्री जी ब्लॉक कंपनीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे. फॅक्टरीत झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

बॉयलरच्या कॅप्सुलमध्ये ब्लास्ट झाल्याने एका मजुराचा मृत्यू तर अन्य 9 मजूर जखमी झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव नंदकिशोर रामकृष्ण करंडे (40 वर्ष) आहे.  मृतक क्रेन ऑपरेटर चे काम करत होता. 

(नक्की वाचा - 'मुख्यमंत्र्याचा गणपती करून समुद्रात उचलून टाकू', बच्चू कडू यांचा इशारा)

स्फोटात जखमी झालेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे. पटेल नावाच्या व्यक्तीची श्री जी ब्लॉक ही सिमेंट काँक्रिटचे ब्लॉक्स बनवणारी कंपनी असून येथे दिवस रात्र काम सुरू असते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: