
मनोज सातवी
वसईच्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानिव बाग हरवटे पाडा येथील जंगलात 28 मे रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. या हत्येचा छडा लावण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. मात्र याचा तपास करताना काही धक्कादायक खुलासेही पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे हा खुन ज्या आरोपीने केला त्याला पकडण्यासाठी पोलिसांना कंडोम बरोबरच सेक्स प्रेची मदत झाली. या आधारेच पोलिसांनी आरोपीला थेट दिल्लीमधून बेड्या ठोकल्या. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी तपास स्वतः हाती घेऊन गुन्हयाच्या तपास केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सायरा बानू वसईच्या धानीवबाग तलाव परिसरात पती आणि दोन मुलांबरोबर राहात होत्या. जियाउल्लाह म्हातावु शाह हे त्यांच्या पतीचे नाव आहे. तर नजाबुद्दीन मोहम्मद सम्मी हा त्यांचा भाचा आहे. नजाबुद्दीन आणि सायरा बानू हे नात्याने भाचा मामी आहेत. मात्र त्यांच्यात अनैतिक संबध होते. मात्र नजाबुद्दीने याने सहा महिन्या पुर्वी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. ही बाब मामी सायरा हिला खटकत होती. त्यामुळे यादोघांमध्ये सतत वाद होत होते. शेवटी यावर शेवटचा तोडगा काढण्याचे ठरले. आपण एकत्र भेटू रोमँन्स करू असे त्याने मामीला सांगितले. त्यानंतर तिही त्याच्या बरोबर जाण्यास तयार झाली.
हेही वाचा - नियम पायदळी तुडवणे अगरवालला भोवले, महाबळेश्वरमध्ये मोठी कारवाई
पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानिव बाग हरवटे पाडा येथील जंगलात 28 मे ला हे दोघेही गेले. तिथेच तिचा त्याने चाकूने खून केला. खून झाल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यावेळी मृतदेह ओळखणे कठीण झाले होते. पण अंगावरील कपड्यावरून ती मुस्लिम असावी असा अंदाज पोलिसांनी लावला. शिवाय मृतदेहाच्या अजूबाचा परिसरही तपासून पाहीला. तिथे त्यांना वापरलेले एक कंडोम आणि सेक्ससाठी वापरला जाणारा स्प्रे सापडला. त्यानंतर त्यावली कोड वरून तो ज्या मेडिकल मधून घेतला होता त्या ठिकाणी पोलिस गेले. त्यांनी तिथे विचारणा केली. मेडीकलच्या मालकाने ज्यानेही कंडोम आणि सेक्स स्प्रे घेतला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले.
हेही वाचा - पुण्यानंतर शिरूरमध्ये भयंकर प्रकार, पोलीस पाटलांच्या अल्पवयीन लेकीने दुचाकीला उडवलं, एक मृत्यू
ती महिला कोण याचा शोध पोलिस घेत होते. त्याचा शोध अखेर थांबला. शोधत शोधत ते धानीवबाग तलाव येथे राहणाऱ्या जियाउल्लाह म्हातावु शाह याच्या घरी गेले. मात्र ते घरी नव्हते. चौकशी केल्यानंतर ते पोलिस स्टेशनला गेल्याचे समजले. त्यांची पत्नी तीन दिवसा पासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याच वेळी मृत अवस्थेतील सायरा यांचा फोटो दाखवला. त्यांचे पती जियाउल्लाह यांनी फोटो हा आपल्या पत्नीचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यनंतर पोलिसांनी त्या मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्यात असलेल्या व्यक्तीलाही त्यांनी ओळखले. तो नजाबुद्दीन असल्याचे त्यांने सांगितले. शिवाय त्याचे आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबध असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय तो दिल्लीत राहात असल्याची माहितीही त्याने दिली.
हेही वाचा - पुणे पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी 'रक्त' देणाऱ्या आईला अटक
पोलिसांनी तातडीने नजाबुद्दीन याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले. त्यावरून तो दिल्लीत असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने एक टीम दिल्लीला रवाना केली. दिल्लीत या टिमने शोध घेत आरोपी नजाबुद्दीन याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world